मालगाडी रुळावरून घसरल्याने वाहतूक विस्कळित : कोकण रेल्वे मार्गावर एकेरी वाहतूक सुरू.अनेक रेल्वे एक्स्प्रेस रद्द अनेक रेल्वे ट्रेनला पाच तास विलंब

पुणे दिनांक १ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई कडून कोकणाकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना काल शनिवारी झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे प्रचंड प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.आधी मेगा ब्लॉकचा व नंतर रुळावरून मालगाडी घसरल्याने वाहतूक व्यवस्थेच्या तीन तेरा व नऊ बारा वाजल्या आहे.आता या अपघाता बाबत आता नव्याने माहिती पुढे आली आहे.मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही वेळे नंतर या मार्गावरील सर्व अडथळे दूर होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान शनिवारी दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास कळंबोली व पनवेल रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडी रुळावरून घसरली व रेल्वे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती.याचा मोठा फटाका रेल्वे वाहतूक व्यवस्थेला बसला व वाहतूक व्यवस्थेच्या तीन तेरा व नऊ बारा वाजल्या.याचा फटका पनवेल वाशीसह कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बसला होता.व या मार्गावरील रेल्वे ट्रेनचे टाइमटेबल कोलमडले होते.दरम्यान यावेळी रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे हेव्ही डब्बे क्रेनच्या सह्हयाने हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.त्यामुळे अनेक रेल्वे एक्सप्रेस उशीरा धावत आहेत.तर काही रेल्वे ट्रेनचा मार्ग बदलावा लागला तर काही रेल्वे ट्रेनच रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल व मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे ट्रेन पाच तास उशिरा धावत आहेत.
दरम्यान या अपघातानंतर रेल्वे ट्रेन उशिरा धावत आहेत.यात सावंत वाडी मुंबई सीएसएमटी गणपती स्पेशल ट्रेन दहा तास उशिरा धावत आहे.तर मडगाव - उधना गणपती स्पेशल ट्रेन बारा तास उशिरा धावत आहे .आज सावंत वाडी वरुन दादरला जाणारी तुतारी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.मंगळुरु जंक्शन एलटीटी गणपती स्पेशल ट्रेन तब्बल नऊ तास उशिरा धावत आहे.हार्बर मार्गावरील पनवेल ते कळंबोली स्थानका दरम्यान रेल्वेच्या रुळावरून घसरलेल्या मालगाडीचा अपघात होऊन २४ तास झाले आहे.त्यामुळे आता प्रवासी चांगलेच संतप्त झाले आहेत.या वेळी प्रवासी यांनी दिवा स्थानंकात प्रवाशांनी ट्रेन रोको केले.त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यामुळे काही काळ लोकलची वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.आता एकेरी मार्गा वरुन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जात आहे.व हळूहळू एक्सप्रेस सोडल्या जात आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.