Crimes : पुणे शहर पोलीसांकडून पालखी सोहळ्याचे जी. पी एस. प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

पुणे.दिनांक ११ ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)या वर्षी पुणे पोलीसांकडून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन पालखी सोहळा अनुभवता यावा या करीता खास जी. पी. एस. द्वारा लाईव्ह पालखी टॅकींगची सुविधाउपलब्धकेलीआहे.
आंळदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही.पालख्याचे.दिनांक १२ जून रोजी पुणे शहरात अगमण होईल या पालखी सोहळ्यातील दिंडयाची अपडेट दिली जाणार आहे.तसेच पालखी मार्गावरील संपूर्ण माहीती नागरिकांसह वाहन चालकांना मिळावी. या साठी खास पुणे पोलीसांकडून वेबपेज. ( diversion pune police. gov.in)तयार केले आहे.
दरम्यान या जी. पी .एस. चा. फायदा पालखी प्रस्थान दरम्यान होणारी वाहतूक कोंडी.टाळणया साठी वेबपेजचा उपयोग होणार आहे.बंद असलेले रस्ते. पालखीचा मुक्काम याची माहिती नागरिकांना या वेबपेज द्वारे मिळणार आहे.त्या मुळे वाहतूक व दैनंदिन जीवनातील कामे. सुरळीत रित्या पार पडणार आहेत. पालखीचे Live LocATion. प्राप्त होण्या करीता दोन्ही पालख्या समावेत ४ मोटरसायकल तैनात करण्यात आल्या आहेत. त्यावर खास जी. पी. एस. द्वारे यंत्रणा बसवण्यात आली आहे.त्याच द्वारे वाहतुकीचे नियोजन तसेच पालखी मार्गावरील संभाव्या बंदोबस्ताच नियोजन अधिक सुलभ होणार आहे.व पालखीच्या ठिकाणावरील अधिकारी व कर्मचारीवर्ग यांची तत्काळ नियंत्रण कक्षाला माहीती उपलब्ध होणार आहे.एस एस पी एम एस काॅलेज मैदान सिंचन नगर रेसकोर्स या ठिकाणी पालखीच्या दर्शनास आलेल्या भाविकांच्या साठी व पालखीतील वाहनासाठी पार्किग व्यवस्था केलेली आहे.सदर वेबपेजचा वापर नागरिकांनी करून संभाव्य गैरसोय टाळावी व पुणे पोलीसांना सहकार्य करावे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.