Crime : कात्रज येथे पुणे पोलिस व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पकडलेले १० लाखांचे पनीर भेसळ युक्तच

पुणे दिनांक २८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील कात्रज चौकात पुणे शहर पोलिस व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत दिनांक ५ जुलैला एक टाटा कंपनीचा टेम्पो ताब्यात घेऊन पाहणी केली असता सदर टेम्पो मध्ये पाहणी केली असता बाॅक्स मध्ये भेसळ युक्त पनीर असल्याचे आढळून आले.या बाबत हे पनीर बाणेर येथील लॅब मध्ये पाठविला होते त्याचा अहवाल आता आला असून हे जप्त केलेले एकूण १० लाख रुपयांचे भेसळ युक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे.व संबधीतांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर गुन्हे शाखा एक चे पोलिसांना माहिती मिळाली की कर्नाटक येथुन बनावट पनीर टेम्पो मधून पुणे येथे आणले जात आहे.व सदरचा माल पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी हाॅटेल मध्ये वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळाली त्या नंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर व पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कात्रज चौक येथे अन्न व औषध प्रशासन कडील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती क्रांती बारवकर यांनी पंचासमक्ष टेम्पोची पाहणी केली व तपासणी केली असता बाॅक्स मध्ये ४.९७० किलो लुज पनीर साठा मिळून आला . पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन सॅम्पल नॅशनल अॅग्रीकल्चर अॅन्ड फुड अॅनालेसिस अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट बाणेर पुणे लॅबला पाठविण्यात आले होते.यातील काही पॅकेट मधील पनीर हे भेसळ युक्त आहे.व ते मानवी शरीरास घातक आहे.हे १० लाख रुपयांचे ४.९७० लुज पनीर नष्ट करण्यात येत असून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पत्र अन्न औषध प्रशासन विभाग मोशी यांना गुन्हे शाखा.पुणे शहर यांनी कळविले आहे.
सदरची कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त पुणे रितेश कुमार.अपर पोलिस आयुक्त ( गुन्हे) रामनाथ पोकळे. पोलिस उपायुक्त ( गुन्हे) अमोल झेंडे.सह पोलिस आयुक्त ( गुन्हे) सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा . वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर.सह पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील.पोलिस उपनिरीक्षक शाहिद शेख पोलिस अंमलदार सुमित ताकपेरे.महेश पाटील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.