ट्रेनची साखळी ओढून प्रवाशांनी मारल्या उड्या : उत्तरप्रदेश येथे पातलकोट एक्स्प्रेसला भीषण आग 🔥

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उत्तरप्रदेश येथील आग्रा जिल्ह्यातील मालपुरा पोलिस स्टेशन येथील भदई रेल्वे स्टेशन जवळ पातालकोट एक्सप्रेस ला भीषण आग लागली.दरम्यान 🔥 आग लागल्यानंतर प्रवासी यांनी ट्रेनची साखळी ओढून ट्रेन थांबल्यावर उड्या मारल्या आहेत.यात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.या आगीत रेल्वे ट्रेनचे दोन डब्बे या आगीत जळून खाक झाले आहेत ही रेल्वे एक्सप्रेस पंजाब मधील फिरोजपूर वरुन मध्यप्रदेश येथील सिवनीकडे जात असताना अचानक आग लागली यावेळी प्रवासी यांनी मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा केली व रेल्वे एक्सप्रेस मध्ये प्रवाशांची यावेळी एकच धावपळ उडाली.यावेळी ट्रेनची साखळी ओढून ट्रेन थांबवली व नंतर पटापट उड्या मारत आपला जीव वाचविला आहे.रेल्वे प्रशासनाच्या वतीने ही आग आटोक्यात आणली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.