व्यावसायिक भागीदार संजय साहाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या : बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या तक्रारीवरून व्यावसायिक भागीदारावर पोलिसांची कारवाई

पुणे दिनांक २ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा मागील काही दिवसांपासून चित्रपटापासून दुर आहे.मात्र असे असताना देखील विवेक ओबेरॉय हा कायमच चर्चेत असतो.विवेक ओबेरॉय यांने काही दिवसांपूर्वीच त्याचा व्यावसायिक भागीदार संजय साहा यांच्यावर गंभीर आरोप केले.इतकेच नाही तर संजय साहा विरोधात थेट पोलिसात धाव घेतली होती.
दरम्यान विवेक ओबेरॉय याने १ कोटी ५५ रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.आता याच प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे कळतय.पोलिसांनी विवेक ओबेरॉय यांच्या तक्रारीवरून संजय साहाला अटक केली आहे.दरम्यान बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने संजय साहा.नंदिता साहा.राधिका नंदा.यांच्या विरोधात तक्रार दिली होती.आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.विशाल रंजन मिश्रा यांच्या चित्रपटांतून विवेक चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगितले जातंय दरम्यान पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात विवेक ओबेरॉय याने काम केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.