Crimes : पुणे शहरातील पोलिस स्टेशन मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बालसेन्ही कक्षाचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दिनांक १६ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात समर्थ.मुंढवा.कोंढवा.वानवडी.मार्केटयार्ड.बिबवेवाडी.व हडपसर या पोलिस स्टेशन मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बालसेन्ही कक्षाचे पोलिस आयुक्त पुणे शहर आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.दरम्यान यावेळी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ एक मधील समर्थ पोलिस स्टेशन येथे व परिमंडळ पाच मधील मुंढवा पोलिस स्टेशन येथे बालसेन्ही कक्षाचे उद्घाटन पोलिस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सदरच्या वेळी परिमंडळ पाच मधील मुंढवा.कोंढवा वानवडी.मार्केट यार्ड.बिबवेवाडी.व हडपसर पोलिस स्टेशन मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बालसेन्ही कक्षाचे उद्घाटन झाले असल्याचे पोलिस आयुक्त यांनी औपचारिक रित्या यावेळी घोषणा केली आहे.होप दी चिल्ड्रेन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील ३२ पोलिस स्टेशन पैकीं २३ पोलिस स्टेशन मध्ये बालसेन्ही कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.या बालसेन्ही कक्षामध्ये विधी संघर्षग्रस्त बालके व काळजी संरक्षणांची गरज असणारी आहे.बालकांचे समुपदेशन व वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्होकेशनल कोर्सेसचे प्रक्षिशण देऊन त्यांचें पुनर्वसन करण्यासाठी मदत केली जाते.त्याकरीता पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस स्टेशन मध्ये बालकल्याण पोलिस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान या कार्यक्रमात पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक.अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील.अपर पोलिस आयुक्त रंजन शर्मा.पोलिस उप-आयुक्त परिमंडळ एक संदीपसिंह गिल . सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती अश्र्विनी राख.सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ.समर्थपोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे.मुंढवा पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हणे.भरोसा सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे.श्रीमती संगिता जाधव.व इतर पोलिस अधिकारी.अंमलदार तसेच होप फाॅर चिल्ड्रेन फाऊंडेशन संस्थापिका श्रीमती कॅराॅलीन व त्यांची टीम व इतर ग्रामस्थ व बालवृदावन उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.