Crimes : दोन पोलीस निरीक्षकासह सात जणाचे तडका फडकी निलंबण पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश

पुणे.दिनांक २९.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) पुणे शहरात गुंडाच्या टोळके हातात कोयते घेवून गाड्याच्या काचा फोडून त्या भागात दहशत निर्माण केली जात आहे. या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार हे चांगलेच अॅक्शन मोडवर आले असून .त्यांनी आज दोन पोलीस निरीक्षकासह एकूण सात जणांची तडका फडकी त्यांचे निलंबण केले आहे.
आता पर्यंत एवढ्या प्रमाणांवर अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे निलंबन करणयांची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. व सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत निलंबन केलेल्या सात जणांची नावे. १) सावळाराम साळगावकर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकार नगर पोलीस स्टेशन. २) मनोज एकनाथ शेंडगे. पोलीस निरीक्षक गुन्हे.३) समीर विठ्ठल शेंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक. ४) हसन मकबूल मुलाणी पोलीस उपनिरीक्षक. ५) मारूती गोविंद वाघमारे .पोलीस उपनिरीक्षक. ६) संदीप जयराम पोटकुले. पोलीस हवालदार ७) विनायक दत्तात्रेय जांभळे. पोलीस हवालदार. अशी नावे आहेत. या पूर्वच पेरूगेट पोलीस चौकीचे तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस उपायुक्त संदीपसिंह गील यांनी निलंबनाची कारवाई केली होती.
पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या नागरीकांची तक्रार त्वरित नोंदवून तातडीने कारवाई करावी .असे आदेशच सर्व पोलीस स्टेशन व चौक्यांना देण्यात आले आहेत. पोलीसांनी तत्परतेने दखल घेऊन त्याला वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई केल्यास अशी कारवाई केल्यास असे गुन्हे घडणार नाही .व आदेशाचे पालन न केल्याने सदरची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे .तसेच आता ठोस पाऊले ऊचलून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षिते बाबत खास करून विषेश अभियान सुरू करण्यात आले आहे.असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी माहीती दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.