Vastu expert murdered : सोन्याच्या हवासापोटी खून केलेल्या वास्तु त्रज्ञांचा मूतदेह अखेर पोलिसांना सापडला

१६ ऑक्टोबर २०२२ रोजी पुणे बिबेवाडी येथे राहणाऱ्या वास्तुतज्ञाचा सोन्याच्या हवा सापोटी निलेश दत्तात्रेय वरघडे ( वय ४३ रा. बिबवेवाडी पुणे) यांचा खून त्यांचाच मित्र याने केला होता व सदरच्या मूतदेह नद्दी मध्ये टाकला होता.या संदर्भात रुपाली वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दिली होती.निलेशचा मूतदेह शोधून काढण्यास पोलिसांना यश आले आहे.
सदर मनुष्य मिसींगचा तपास सपोनि श्री प्रविण काळुखे,पोलीस उप निरीक्षक श्री संजय आदलिंग व तपास पथकातील स्टाफ असे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सदर मनुष्य मिसींगचे तपासामध्ये मिसींग व्यक्ती ही दिपक जयकुमार नरळे याचे बरोबर गेला होता व दिपक नरळे याने स्वत:चा मोबाईल फोन बंद करून आपले अस्तित्व लपविलेने त्याने अपह्मत इसमा कडील दागिण्याचे मोहापोटी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण केले बाबत श्रीमती रूपाली वरघडे यांनी तक्रार दिली असून त्याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.187/2022 भा.द.वि.कलम 364 अन्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये संशयीत आरोपी दिपक जयकुमार नरळे, वय 29 वर्षे, त्यास शिताफीने पकडून तपास करता त्याने त्याचा साथीदार नामे रणजीत ज्ञानदेव जगदाळे, वय 29 वर्षे,याचे बरोबर कट करून निलेश वरघडे यास कॉफीमधून झोपेच्या गोळया देवून नंतर त्याचा दोरीने गळा आवळून मृतदेह पोत्यात भरून तो नीरा नदी,सारोळा पुलावरून नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेचे निष्पन्न झाले असून वर नमुद दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. आज पावेतो दाखल गुन्हयात वापरलेली एकइर्टीगा कार,दोन दुचाकी वाहने तसेच अपह्मत इसमाचे सोन्याचे दागिने,दोन मोबाईल असा एकूण 19,16,400/-रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे
दाखल गुन्हयातील आरोपी हे अपह्यत निलेश वरघडे याचा दोरीने गळा आवळून मृतदेह पोत्यात भरून तो नीरा नदी,सारोळा पुलावरून नदीत टाकून पुरावा नष्ट केला असल्याच सांगत असल्याने अपह्यत निलेश वरघडे याच्या मृतदेहाचा निरानदीत युध्दपातळीवर शोध मोहिम सुरु केली होती. तब्बल 17 दिवसांनी निलेश वरघडे याचा मृतदेह सारोळा येथील निरा नदीत शोध घेण्यास बिबवेवाडी पोलीसांनी, महाबळे·ार ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यु टीम,भोईराज आपत्ती संघ भोर, वाईल्ड वेस्ट अॅडव्हेंचर कोलार्ड रत्नागिरी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य,स्थानिक मच्छीमार, व शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद पटेल यांनी सातत्याने सचोटीने जिद्द न हारता निरा नदी पात्रात शोध मोहिम राबवत मृतदेह शोधण्यात यश मिळविले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा.पोलीस उप आयुक्त श्रीमती नम्रता पाटील,परिमंडळ 5 पुणे शहर व मा.सहा.पोलीस आयुक्त श्रीमती पोर्णिमा तावरे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता जाधव,पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री प्रविण काळुखे,पोलीस उप निरीक्षक श्री संजय आदलिंग,श्री विवेक सिसाळ,पोलीस अमंलदार सहा.पोलीस उप निरीक्षक रविंद्र राऊत,पोलीस हवालदार शाम लोहोमकर,देशमाने, संतोष जाधव, सतिश मोरे,तानाजी सागर,शिवाजी येवले,अतुल महांगडे,प्रणव पाटील,अभिषेक धुमाळ व अनिल डोळसे, ज्ञाने·ार डाके,नितीन धोत्रे,महाबळे·ार ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यु टीम भोई राज आपत्ती संघ भोर, वाईल्ड वेस्ट अॅडव्हेंचर कोलार्ड रत्नागिरी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य,स्थानिक मच्छीमार,व शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद पटेल यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.