Police officer arrested for accepting bribe : बार्शी फटाका स्फोट प्रकरणी 30000 ची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत." हा तर मृत्यू झालेल्या चार कामगाराच्या टाळू वरील लोणी खाण्याचा प्रकार"

बार्शीमधील पांगरी गावाजवळील शिराळे गावात फटाके कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. फटाका फॅक्टरी स्फोटाचा तपास सुरू असताना, पांगरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने मोठा धमाका केला आहे. एसीबीने 15 हजार रुपयांची लाच घेताना अधिकाऱ्यास पकडले.
लाच स्वीकारण्याची नवी पद्दत दिसून आली. पोलीस ठाण्यात किती लाच द्यायची हे ठरवून मग त्या व्यक्तीला कॅन्टीन मध्ये जाऊन ठरलेली रक्कम जमा करावी लागत असे.
असाच बुधवारी ११ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता सादर लाचेची रक्कम पोलिसांनी स्वीकारली. एसीबी टॅग धरून या सगळ्यांवर लक्ष ठेवून च होती. त्यांनी लगेच कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले व त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्यता फटका फॅक्टरी स्फोट प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, यातील मुख्य आरोपी नाना पाटेकर हा अजूनही फरार आहे. त्याचा तपास सुरु असतांना पांगरी पोलीस ठान्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे हे एसिबी च्या कचाट्यात अडकले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.