मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : ३० लाख २३ हजार रुपयांचा ६० किलो गांजा जप्त करुन पोलिसांनी चौघांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई मधील पूर्व उपनगरात विकण्यासाठी आणलेला गांजा ६० किलोचा बाजारात त्यांची किंमत अंदाजे ३० लाख २३ हजार रुपयांचा जप्त करुन मुंबई गुन्हे शाखा युनूट सातच्या पोलिसांनी एकूण चौंघाजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.व त्यांच्या कडून गांजा जप्त केला आहे.
दरम्यान गांजा तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौंघाची नावे १) मोशिम गफूर शेख ( वय ३५ ) २) मोहम्मद रहीम खान (वय ४२ ) ३) रोहित विलास भालेराव ( वय २६ ) ४) राकेश माधव गायकवाड ( वय २७ ) अशी आहेत.या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती.की गांजा तस्कर हे मुलुंड येथे गांजा विक्री करीता येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्याकडून ६० किलो गांजा जप्त केला आहे.या कारवाई मुळे गांजा तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.