पुण्यात कोयत्या गॅगची दहशत कायम : सिंहगड रोडवर टोळक्याने केला पोलिसांच्या मुलाचा कोयत्याने सपा सप वार करून खून

पुणे दिनांक २९ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात कोयता गॅगची दहशत कायम असून पुण्यातील सिंहगड रोड वर पोलिसाच्या मुलाचा खून केला आहे.अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने सपा सप वार करुन खून केला आहे.सदरची घटना ही पावने सातच्या सुमारास घडली आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रोडवर लाईन बाॅय विजय ढुमे यांचा खून झाला आहे.सदरची घटना ही सिंहगड रोडवरील क्वाॅलिटी लाॅज जवळ घडली आहे.
दरम्यान सिंहगड रोडवरील क्वाॅलिटी लाॅज मधून विजय ढुमे उतरत होता.तो लाॅजमधून बाहेर आल्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी अचानक पणे धारदार कोयत्याने त्यांच्या वर सपा सप वार करुन त्याचा खून केला.हल्ल्या नंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला हल्ल्या नंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.सदरची घटना सिंहगड रोड पोलिसाना मिळतात घटना स्थळी गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी दाखल झाले.अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांन विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.या हल्लेखोरांचा तपास पोलिस करीत आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.