Crime : हनीट्रॅपममध्ये प्रकरणी प्रदीप कुरूलकरची होणार ' व्हाईसलेयरसायकोलाॅजिकल ॲनालिसिस'टेस्ट

पुणे दिनांक २२ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपीवरून अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदिप कुरूलकर यांच्या व्हाईस लेयर सायकोलाॅजिकल ॲनालिसिस चाचणीस रितसर परवानगी मिळविण्यासाठी सरकार पक्षाकडून शुक्रवारी न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे.
सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केलेल्या लेखी युक्तिवादात म्हणाले आहे की. व्हाईस लेयर सायकोलाॅजिकल ॲनालिसिस चाचणी घेण्या साठी कुरूलकर यांची संमतीची आवश्यकता नाही. या तपासाला दिशा मिळावी यासाठी. ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चाचणीला परवानगी मिळावी . ॲड फरगडे यांनी हा लेखी युक्तिवाद न्यायालयात सादर केला.
कुरूलकर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले कागदपत्रे आद्याप मिळालेली नाहीत.त्यामधील बरेच जबाब सीलबंद आहेत.त्यामुळे जबाबात नेमके काय म्हणाले. या बाबतची माहिती मिळाल्यास युक्तिवाद करणे सोपे होईल. असा बचाव कुरूलकर यांचे वकील ॲड.ॠषिकेश गानू यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हणाले आहे. कुरूलकर यांच्या व्हाईस लेयर सायकोलाॅजिकल ॲनालिसिस चाचणीवर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
प्रदीप कुरूलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरूलकर यांना हनीट्रॅपममध्ये अडकवले होते .त्यांच्या हालचाली व वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांचा लॅपटॉप व मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशी साठी हे प्रकरण सोपविण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.