मुंबई हायकोर्टाचा निर्णय : साई रिसाॅर्ट प्रकरणी ५ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

पुणे दिनांक ५ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देण्याऱ्यां दापोली येथील साई रिसाॅर्ट प्रकरणी आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी सुनावणीत मुंबई हायकोर्टानं शिवसेना आमदार अनिल परब यांना ५ डिसेंबर पर्यंत अटके पासून संरक्षण कायम ठेवले आहे.
दरम्यान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्यावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसाॅर्ट गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कडे तक्रार केली होती.त्यानंतर या गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब हे मुख्य आरोपी असल्याचा दावा करत ईडीच्या वतीने न्यायालयात ECIR केला होता.सदरचा ECIR रद्द करण्यात बाबत अनिल परब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतू आता या याचिके प्रकरणी सुनावणी ५ डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.व तोपर्यंत परब यांना कोर्टाने अटके पासून संरक्षण दिले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.