Pune 22 vehicles vandalized : पुणे : पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात 22 वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड, 1 जानेवारी 2023: पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात अज्ञात टोळक्याने 20 ते 22 वाहनांची तोडफोड केली आहे.
कोयते आणि सिमेंट ब्लॉकने वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या टोळीला रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञात व्यक्तींनी धक्काबुक्की करून ऑटोरिक्षात बसून पळ काढला.
सांगवी व वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रहाटणी व पिंपळे सौदागर येथे एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. 31 डिसेंबर शनिवार असल्याने शहरात दीड हजारांहून अधिक पोलिसांची उपस्थिती होती. मात्र, चार ते पाच जणांच्या अज्ञात टोळक्याने ऑटोरिक्षात येऊन दुचाकी व चारचाकी वाहनांना टार्गेट करून सिमेंट ब्लॉकसह मोकळ्या वस्तूंनी वाहनांची तोडफोड केली.
याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.