Young man's wrist cut : पुणे : १०० रुपये देण्यास नकार दिल्याने तरुणाचे मनगट कापले.

शनिवारी मध्यरात्री पाषाण परिसरात दारूच्या नशेत एका टोळक्याने एका तरुणावर हल्ला करून त्याचा हात कापला. त्या व्यक्तीने 100 रुपये देण्यास नकार दिल्याने टोळक्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
टोळीने केलेल्या हल्ल्यात त्या व्यक्तीचे मनगट कापले गेले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दोन तरुण आणि दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी आणि त्याचे मित्र पाषाण परिसरात राहतात. तांबोळी एका शैक्षणिक संस्थेत शिकत आहे. उपाहारगृह बंद असल्याने मध्यरात्री तांबोळी व त्याचे मित्र पाषाण परिसरातील साई चौकात जेवणासाठी गेले. पहाटे एकच्या सुमारास आरोपीने त्याच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली. तांबोळी यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचा हात कापला गेला.
आशुतोष अर्जुन माने (वय 24, रा. दुर्वांकुर सोसायटी, पंचवटी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने यांचा मित्र पंकज अनंत तांबोळी (२५, रा. पाषाण) याच्या मनगटावर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दुखापत झाली. याप्रकरणी प्रणव काशिनाथ वाघमारे (वय 18, रा. पाषाण) आणि गौरव गौतम मानवतकर (वय 20, रा. तोंडेचाळ, सुतारवाडी, पाषाण) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.