Pune CP Amitabh Gupta Century : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचे मारले शतक...

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेताच. शहरातील गुन्हेगारीला चाप लावून ती नियंत्रणात आणली. छोटे मोठे भाई त्यांच्या मुस्क्या आवळून कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ट्रॅकवर आणली, वेळे प्रसंगी मोका, कडक कारवाहिनी त्यांच्या नांग्या ठेचल्या. आजची ही त्यांची मोक्काची १०० वी कारवाई करून त्यांनी नाबाद असे शतक ठोकले आहे. असे म्हणले तर वावगे ठरणार नाही...
मागच्याच आठवड्यात सायबर पोलिसांनी कारवाई करीत संघटित गुन्हेगारी करून तसेच आम जनतेला आर्थिक फायद्याचे आमीष दाखवून त्यांची लुबाडणूक करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सोलापुरातील अट्टल गुन्हेगार धीरज भारत पुणेकर ( वय.३६. रा.सोलापूर ) या टोळीचा हा प्रमुख व त्याचे अन्य आठ साथीदार या सर्वांवर आर्थिक फसवणूक प्रकरणी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी ( मोक्का ) नियंत्रण नुसार १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या १०० वी म्हणजेच शतक ... कारवाई बाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की पुणे शहरात अनेक नागरिकांची व सर्व सामान्य गरीब जनतेची ऑनलाइन कर्जाच्या नावावर प्रचंड लूट तसेच नंतर त्यांना धमकी देऊन वसुलीच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली होती याच अनुषंगाने सायबर पोलिसांनी तपास करून पुणे व सोलापूर व तसेच कर्नाटक राज्यातून या टोळीच्या सदस्य असणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या होत्या यातील आरोपींची सर्वसामान्य नागरिकांना फसविण्याची मेथड ही अशी होती की लोन आपलिकेशन युजरच्या हँडसेट मध्ये डाऊन लोड करून ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर युजरच्या हँडसेटचा कॅमेरा कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन मेसेज स्टोरेज मायक्रोफोन व गॅलेक्सी याची परमिशन चालू करण्याचा मेसेज मोबाईलचा होम स्क्रीनवर प्राप्त होतो.
दरम्यान या सर्व परमिशन यूजर द्वारे प्राप्त झाल्यानंतर विजेचा मोबाईल मधील संपूर्ण डेटा संबंधित कंपनी तो सर्व डेटा क्लोन करून सर्वर मध्ये स्टोअर करून ठेवते. कर्जाची अनामत रक्कम प्रोसेसिंग फी जमा करून विजेच्या अकाउंट मध्ये जमा झाल्यावर सात दिवसाच्या अवाच्या सव्वा म्हणजेच ३० ते ३००% टक्के पर्यंत व्याज आकारून त्या रकमेची परतफेड करण्यास सांगत होते. मी जर हे सर्व पैसे भरून देखील त्यांना पुन्हा पैसे भरण्याकरिता कॉल करीत असे तसेच त्यांना यासाठी धमक्या देऊन प्रचंडपणे मानसिक त्रास देत लोन ॲपच्या माध्यमातून खंडणी स्वीकारून फसवणूक केल्याबद्दल पुणे सायबर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी धीरज भारत पुणेकर. ( वय.३६. रा.घर. संजय नगर कुमटे नाका सोलापूर.) या टोळीप्रमुखासह त्याच्या इतर आठ साथीदारावर गुन्हा दाखल आहे.
तील आरोपी पुढीलप्रमाणेः
१) धिरज भारत पुणेकर (वय ३६ वर्षे रा.घर नं.७५, संजयनगर, कुमठेनाका, सोलापूर
(टोळी प्रमुख)
२) स्वप्नील हनुमत नागटिळक (वय २९ वर्षे सध्या रा.पापाराम नगर, विजापुर रोड सोलापूर, मुळ रा.वसाहत नं.२ चाँदतारा मशिदीसमोर विजापुर सोलापूर)
३) श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय २६ वर्षे रा.प्लॅट नं.४०१ शिवशक्ती चौक त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी हडपसर पुणे)
४) प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३ वर्षे रा. प्रियदर्शनी सोसायटी प्लॅट नं. ४ मुमताजनगर कुमठेनाका सोलापूर)
५) सॅम्युअल संपत कुमार (वय ४० वर्षे रा. ४०४ एमबीआर सुर्वे अपार्टमेंट डिकोजा रोड बेलातुर बंगलोर राज्य कर्नाटक)
६) सय्यद अकिब पाशा (वय २३ वर्षे रा.गंगा मोगोली रोड लस्सी शॉप जवळ हसकोटे जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक)
७) मुबारक अफरोज बेग (वय २२ वर्षे रा न्यु चैतन्य हॉस्पिटल जवळ हसकोटे बस स्टॉपजवळ जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक)
८) मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम (वय ४२ वर्षे रा.बरांदीयल हाऊस अरूर पोस्ट पुरामेरी कोझीकोड अरुर केरळ)
९) मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय ३२ वर्षे रा.मनियत हाऊस, तालुका पडघरा, जिल्हा कलिकत, राज्य केरळ)
सप्टेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील मकोका अंतर्गत करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे:
कालावधी - एकुण मोक्का - आरोपी
२० सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० - ०७ - ५४
जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ - ५६ - ४००
जानेवारी २०२२ ते ०७ ऑक्टोबर २०२२ - ३७ - २१६
एकूण १०० मोक्का आणि ६७० आरोपी
मकोका कारवाई मध्ये पुणे शहरातील खालील कुप्रसिध्द टोळी मधील गुन्हेगांराचा समावेश आहे. नावे पुढीलप्रमाणेः
१. बंडु आंदेकर
२. निलेश घयवाळ
३. सचिन पोटे
४. बापु नायर
५. सुरज ठोंबरे
७. अक्रम पठाण
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.