Pune crime : कारच्या काचा फोडुन लॅपटॉप चोरणा-या अट्टल गुन्हेगाराकडुन चोरीेचे 41 गुन्हे उघड

मागील काही दिवसांपासुन पुणे शहर परिसरात आरोपींकडुन कारच्या काचा फोडुन,त्यामधील लॅपटॉप चोरी करून जाणा-या गुन्हयास आळा घालण्यासाठी,युनिट-4 कडील पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ पथक असे चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना,पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,चतु:श्रृंगी मंदीराचे जवळील खिंडीतला गणपती मंदीराचे लगत असणा-या खाऊ गल्लीत एक इसम कमी किंमतीत लॅपटॉप विकत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने युनिट- 4 कडील पथक बातमीचे ठिकाणी जावुन,आकाश ऊर्फ विकास ऊर्फ विकी धरमपाल ठाकुर,वय-34 वर्षे,सध्या रा.बालेवाडी मारुती मंदिराचे जवळ, बालेवाडी,पुणे,मुळपत्ता रा.सच्चाखेडा,जिल्हा-जिंद,राज्य हरियाना यास ताब्यात घेंवुन,त्याची अंगझडती घेतली असता,त्याचेकडे 3 Apple कंपनीचे, 2 डेल कंपनीचे, 1 एचपी कंपनीचा, 1 Asus कंपनीचा, 1 लिनोव्हा कंपनीचा Dolby Almos टॅप असे 8 लॅपटॉप व Activa स्कुटर असा एकुण 4,40,000/- रुपये किचा मुद्देमाल जप्त करुन,त्यास चतु:श्रृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट रनंबर 445/2022 भा.द.वि.कलम 379,427 या गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने पुणे शहर व परिसरात सुमारे दोन ते अडीच वर्षा पासुन त्याचा साथीदार सुशिलकुमार ऊर्फ बिंदु,रा.दिल्ली याचे साथीने एकुण 41 गुन्हे केल्याचे कबुल केले.त्याने चोरीत मिळालेले काही लॅपटॉप दिल्ली व हरियाणा येथे ठेवल्याचे सांगितले. त्याप्रम् युनिट-4 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कस्टडीतील आरोपीस हरियाणा,दिल्ली याठिकाणी तपासकामी घेवुन गेले. तेथुन आरोपीकडुन 3,90,000/- रुपये किंमतीचे एकुण 8 लॅपटॉप जप्त केले.
सदर आरोपी आकाश ऊर्फ विकास ऊर्फ विकी धरमपाल ठाकुर हा पार्लर मध्ये हेअर आर्टीस्टचे काम करतो. तो त्याचे साथीदारासह शहरा मध्ये फिरुन पार्क केलेल्या कारच्या काचा फोडुन,त्यातील बॅगा चोरी करुन बॅग मधील मौल्यवान वस्तु / लॅपटॉप / रोख रक्कम काढुन घेवुन रिकामी बॅग व कागदपत्रे नदीपात्रात फेकुन देत असे. तसेच रोख रक्कम मिळाल्यास त्यातुन स्वत:ची हौसमौज करीत असे. चोरी केलेले लॅपटॉप साथीदारा सोबत मुळगावी किंवा दिल्ली येथे घेवुन जाऊन त्याची तिकडेच विल्हेवाट लावत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे कसोशिने तपास करुन त्याने पुणे शहर परिसरात एकुण 41 गुन्हे उघडकीस आणुन आत्तापर्यंत एकुण 16 लॅपटॉप व चोरी करीता वापरलेली अॅक्टीव्हा मोपेड असा एकुण 8,35,000/- रु. चा मुद्द्ेमाल जप्त केला आहे. पुढील तपास युनिट-4 कडील पोलीस अंमलदार,विठ्ठल वाव्हळ हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभगुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, मा. सहायक पोलीस आयुक्त,गुन्हे-2,श्री.नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक,गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक,जयदीप पाटील व युनिट-4 कडील पोलीस अंमलदार महेंद्र पवार, अजय गायकवाड, हरिष मोरे, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ,नागेशकुंवर, प्रविण भालचिम, संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे, मनोज सांगळे, अशोक शेलार, वैशाली माकडी, शितल शिंदे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.