Pune crime : दर दिवसाला 15,000/- रुपये दंड व दरमहा 10 टक्के दराने व्याज घेणा-या सावकारावर गुन्हा दाखल

प्रसाद कुतळ यांचेकडुन 5,00,000/- रुपये प्रति महीना 10 टक्के व्याजदराने घेतले होते. त्याची अर्जदार यांनी गैरअर्जदार यांस रोख व ऑऩालाईन स्वरुपात 5,95,000/- रुपये परतफेड केलेली असताना देखील अर्जदार यांनी वेळेत व्याजाचा हप्ता दिला नाही म्हणुन प्रत्येक दिवसाला 15000/- रुपये दंड असे एकुण 18,10,000/- रुपयांची अवाजवी रक्कमेची मागणी करुन अर्जदार यांचे घरी जाऊन शिवीगाळ दमदाटी करत असले बाबतचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.
सदर अर्जाची खंडणी विरोधी पथक-2,गुन्हे शाखा,पुणे शहर यांचेकडुन चौकशी होवून चौकशीअंती व अर्जदार यांनी सादर केलेल्या पुराव्या नुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द फिर्याद दिल्याने अवैद्य सावकर प्रसाद किसन कुतळ,वय-45 वर्षे,रा.फ्लॅट नं.308, ए विंग,जेधे पार्क हौसींग सोसायटी,रास्ता पेठ,पुणे याचेवर लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.143/2022,भा.दं.वि.कलम 386,387,452,504 व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39,45 प्रमाणे खंडणी मागणे व अवैद्य सावकारी केले बाबतचा गुन्हा खंडणी विरोधी पथक-2 गुन्हे शाखा पुणे शहर यांनी दाखल केला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.सह पोलीस आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे),श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,(गुन्हे),श्री.श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-2,श्री.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक-2,गुन्हे शाखा,पुणेचे पोलीस निरीक्षक,बालाजी पांढरे, सहा.पो.निरीक्षक,चांगदेव सजगणे, पोलीस उप-निरीक्षक,श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार,विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरंेद्र साबळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे व आशा कोळेकर यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.