Pune crime : मटका अड्डयावर छापा टाकुन 18 आरोपींवर कारवाई करून एकुण 96,090 रू चा मुद्देमाल जप्त

२० ऑक्टोबर २०२२ रोजी हद्दीत डोके तालमीच्या मागे पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीनुसार सदर ठिकाणी,सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे, शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकुन पैशावर बेकायदेशीर मटका जुगार घेणारे व मटका जुगार खेळणारे 08 इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यात रोख रक्कम 34,020/- रू. घटनास्थळावरून जप्त केले. सदर प्रकरणी नमुद 08 इसम व 01 पाहिजे आरोपी असे 09 इसमांविरूध्द समर्थपोलीस स्टेशन येथे गुरनं 186/2022 महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन,त्यांना पुढील कारवाई करीता समर्थ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच दि.21.10.2022 रोजी पार्किंगच्या मोकळया जागेत सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीनुसार,सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे, शाखे कडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन,छापा टाकुन,पैशावर बेकायदेशीर मटका जुगार घेणारे व मटका जुगार खेळणारे 08 इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम 62,070/- रूनये घटना स्थळावरून जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी नमुद 08 इसम व 01 पाहिजे आरोपी असे 09 इसमांविरूध्द अंलकार पोलीस स्टेशन येथे गुरनं.129/2022,महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन,त्यांना पुढील कारवाई करीता अलंकार पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री.अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्त,पुणे शहर, श्री.संदिप कर्णिक,पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री.रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणेे, श्री.श्रीनिवास घाडगे,पोलीस उप आयुक्त,गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विजय कुंभार तसेच सहा.पो.निरी. अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार,राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, हणमंत कांबळे, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे व महिला पोलीस अंमलदार, मनिषा पुकाळे या पथकाने यशस्वी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.