Pune crime : लहान बाळाचा सहारा घेऊन मोबाईल चोरी करणारी महिला गजाआड.. दीड लाखांचा ऐवज जप्त

सहा महिन्याच्या बाळाचा सहारा घेऊन निरगस व इमोनिशल पणे महिलांच्या मागे उभे राहून त्यांच्या पर्समधील महागडे मोबाईल चोरणाऱ्या महिलेला पेट्रोलिंग करणाऱ्या समर्थ पोलिसांनी अटक करून तिच्याकडून.१ लाख ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले आहे.
समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा त्रंबके महिला पोलीस नाईक रूपाली काळे यांना गोपनीय रित्या खबर मिळाली की एक मोबाईल चोर महिला आपल्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन निर्गसपणा दाखवून व इमोनिशल पणे महिलांच्या गर्दीत महिलांच्या मागे थांबून त्यांची नजर हटवून त्यांच्या पर्स मधील महागडे मोबाईल चोरत होती. या अनुषंगाने पोलीस पथकाने सदर महिलेला अटक करून तिच्या कडून एकूण १२. मोबाईल त्याची एकूण किंमत.१ लाख ४०.हजार. रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची महिला ही उत्तर प्रदेश मधील राहणारी असून तिचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. तपासामध्ये या महिलांने रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स मधील मोबाईल चोरी केले आहे. तसेच पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी देखील या महिलेने अनेक महिलांच्या पर्स मधून मोबाईल चोरले आहे. तिच्याकडे असणाऱ्या लहान बाळामुळे अनेकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण या संधीचा तिने मोबाईल चोरीसाठी उपयोग केला. या चोरीमध्ये तिच्याबरोबर अन्य कोणी चोरीत सहभागी आहे का.? याचा शोध पोलीस घेत आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ एकचे संदीप सिंह गिल्ल. सहाय्यक पोलीस आयुक्त फरस खानाचे सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके महिला पोलीस नायक रूपाली काळे पोलीस अमलदार हेमंत पेरणे. रहीम शेख. कल्याण बोराडे. दत्तात्रय भोसले. गणेश वायकर. प्रमोद जगताप. रोहिदास वाघिरे. सुभाष पिंगळे. श्याम सूर्यवंशी यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.