Pune crime : ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन, खंडणी उकळणाया आरोपीस अटक

तक्रारदार बांधकाम व्यवसाईक यांचे ऑफीस आरोपी विजय महादेव गायकवाड, मार्केटयार्ड,पुणे यास 01 वर्षापुर्वी भाडयाने दिले होते. सदरचे भाडेकराराची मुदत संपल्याने त्यांनी काही दिवसांपुर्वीच विजय गायकवाड यास सदरचे ऑफिस / गाळा सोडण्याबाबत सांगितले होते. त्याने गाळयाचे भाडे थकवल्याने, तसेच त्याची भाडेकराराची मुदत संपल्याने त्यांनी त्यास मुदत देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने गायकवाड याने त्यांचेशी जोरदार भांडण करुन,नविन ठिकाणी जागा घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करुन भाडेकरार मुदतवाढ किंवा 02 लाख रुपये न दिल्यास पोलीसात ऍट्रॉसिटीची तक्रार देण्याची धमकी दिली होती.
तसा तक्रारी अर्ज स्वारगेट पोलीस स्टेशनला दाखल केला होता. तक्रारदार यांचे तक्रारीवरून विजय गायकवाड याचेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येवुन,त्यास अटक करणेत आलेली आहे. अटक विजय गायकवाड याचेकडे / त्याच्या कार्यालयात अनेक वेग-वेगळया फर्मचे शिक्के, लेटरर्स व शाळांचे दाखल्यांच्या प्रती सापडले असुन,त्याने अनेकांकडुन खंडणी उकळल्याचे तसेच अॅडमिशनच्या व लोन करुन देण्याच्या नावाखाली फसवणुक केल्याची व इतर ठिकाणी खोटे ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले असल्याची माहीती मिळत आहे. विजय गायकवाड हा वारंवार खोटे ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याकरीता पोलीसां विरोधात आंदोलन करुन दबाव आणत असतो. पोलीस त्याचा कसुन तपास करीत असुन,त्याच्याबाबत काही तक्रार असल्यास न घाबरता स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
सदरची कारवाई श्री.संजय डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर, श्री.सागर पाटील,पोलीस उप आयुक्त,परि-2,पुणे शहर, श्रीमती.सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त,स्वारगेट विभाग,पुणे शहर, श्री.अशोक इंदलकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर, श्री.सोमनाथ जाधव,पोलीस निरीक्षक,(गुन्हे),स्वारगेट पोलीस ठाणे,पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक,प्रशांत संदे यांनी तपास पथकातील अंमलदार यांचेसह त्याचा शोध घेवुन त्यास अटक केलेली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक,प्रशांत संदे हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.