Pune Crime : खुन करुन पसार झालेल्या आरोपीस 08 तासात सिहंगडरोड पोलीसांकडुन जेरबंद

२५ सप्टेंबर २०२२ रोजी सिहंगड रोड पोलीस स्टेशन गु.र.न.418/2022 भा.द.वि.क.302 अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस स्टेशनकडील अधिकारी व इतर स्टाफ यांनी सदर घटनास्थंळावर जाणारे रोडवरील सर्व तांत्रिक विश्लेष्णची पडताळणी करुन,पोलीस अंमलदार, राहुल ओलेकर, क्षीरसागर, अविनाश कोंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,दाखल गुन्हयातील आरोपी नामे स्वप्निल उभे हा जनता वसाहत,वाघजाई टेकडीवर लपुन बसलेला आहे व त्याने अंगात लाल,पांढ-या व काळया रंगाचा टी शर्ट,निळी जिन्स पॅन्ट व पायात चप्पल घातलेली आहे.
सदर बातमीचे अनुशंगाने पोउपनि स्वप्नील लोहार व इतर स्टाफ यांचेसह बातमीचे ठिकाणी जावून खात्री करता,सदर व्यक्ती हा तेथुन पळुन जात असताना,शिताफिने स्टाफच्या मदतीने त्यास लागलीच काही अंतरावर पाठलाग करून,ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता,त्याने त्याचे नाव स्वप्निल अंकुश उभे,वय-22 वर्षे,रा.माऊली आंगण अपार्टमेंन्ट,फलॅट नं.103,सदाशिव दांगटनगर,धबाडी,वडगांव-बुद्रुक,पुणे असे सांगितले,त्याने स्वत: गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास वरील दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्री.जंयत राजुरकर करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही .श्री.राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेक्षिक विभाग,पुणे,श्रीमती पोर्णिमा गायकवाड,पोलीस उप-आयुक्त,परि-3,पुणे,श्री.सुनिल पवार, सहा. पोलीस आयुक्त,सिंहगड रोड विभाग,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री.शैलेश संखे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.जयंत राजुरकर,पोलीस निरीक्षक,(गुन्हे),सचिन निकम,सहा.पोलीस निरीक्षक, स्वप्नील लोहार,पोलीस उप निरीक्षक, सहा.पोलीस फौजदार,आबा उत्तेकर, सुनिल चिखले, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, शंकर कुंभार, अमित बोडरे, अमेय रसाळ, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोंडे, अमोल पाटील, विकास पांडुळे, विकास बांदल, सागर शेडगे केतन लोखंडे, गणेश झगडे, गौतम किरत कुडवे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.