Pune crime : कंपनीच्या जुन्या कामगाराने साथीदारासह गोडावुन मधील रखवालदाराचा खुन करुन चोरी केलेल्या गुन्हेगारास 20 शिताफीने केले जेरबंद

हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.1429/2022 भा.द.वि.कलम 302 अन्वये गुन्हयाचे घटनास्थळी गुन्हे शाखा,युनिट-5 कडील पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी समक्ष भेट देऊन युनिटकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी धावडेवस्ती,भोसरी, पिंपरी-चिंचवड येथे शोध घेत असताना,त्यांना मिळालेल्या बातमीवरुन 1)ध्रुवदेव राजेंद्र राय,वय-24 वर्षे,रा. भोसरी,पुणे व मुळगाव-बढदाहिया,ता.मढवरा,जि.छपरा सारणविहार,राज्य बिहार 2)पंकजकुमार सिकंदर राय,वय-22 वर्षे,रा. भोसरी,पुणे मुळगाव-बढदाहिया,ता.मढवरा,जि.छपरा सारणविहार, राज्य बिहार 3)अजयकुमार लखदेवप्रसाद यादव,वय-24 वर्षे,धंदा-हेल्पर,रा. भोसरी,पुणे व मुळगाव-माधवपुर हजारी,थाना साहेमगज, जि.मुजफरपुर,राज्य बिहार यांना आज दि.16/11/2022 रोजी ताब्यात घेतले आहे.
सदर ताब्यातील इसमांकडे तपास करता, आ.क्र.2 पंकजकुमार सिकंदर राय याने सांगितले की,तो यापुर्वी मोनार्च कंपनी,जळगाव येथे कामास होता. त्याठिकाणी काहीदिवस राहुन,कंपनीच्या मालाची डिलेव्हरी घेऊन कंपनीचे फुरसुंगी हडपसर येथील गोडावुन मध्ये येत होता. त्याला गोडावुनची आणि परिसराची माहिती होती. त्याने त्याचे साथीदार ध्रुवदेव व अजयकुमार यांना कंपनीचे गोडावुनबाबत माहिती देऊन,तेथे मोठया प्रमाणात कंपनीचे लोखंडी पाईप असतात तेथे फक्त एकच इसम रहावयास आहे. तेथील माल चोरल्यास त्यांना फायदा होईल असे सांगितले व त्याप्रमाणे 3-4 दिवस अगोदर पंकजकुमार व ध्रुवदेव राय यांनी फुरसुंगी,हडपसर येथे येऊन गोडावुनची माहिती घेतली होती. त्यानंतर ते दिनांक 11/11/2022 रोजी भोसरी येथुन फुरसुंगी हडपसर येथे रात्रीच्या वेळी मोनार्च कंपनीच्या गोडावुनच्या पाठीमागील दाराने आत मध्ये येऊन वॉचमनचे रुम मध्ये जाऊन वॉचमनला पकडुन त्याने आरडा-ओरड करु नये म्हणुन त्यांनी तिघांनी त्यास पकडुन त्याचे खाटेवर जोरात आपटले आणि त्याचे रुम मधुन त्याचा वापरता मोबाईल हॅन्डसेट,त्याचे ए.टी.एम कार्ड व 2,000/- रुपये रोख रक्कम चोरले.
तसेच तेथील गोडावुनची चावी घेऊन गोडावुन आणि कंपनीचे मेनगेट उघडुन,गोडावुन मधील लोखंडी पाईप चोरी केली होती. सदर बाबत नमुद आरोपीतांनी मोनार्च कंपनी गोडावुन,फुरसुंगी,हडपसर येथील लोखंडी पाईप चोरी करण्याचे उद्देशाने तेथील कंपनी वॉचमन / कामगार काशिनाथ कृष्णा महाजन हा आरडा-ओरड करुन विरोध करेल म्हणुन त्यास जीवे ठार मारले व तेथील लोखंडी पाईप चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने,सदर संवेदनशील गुन्हा युनिट-5,गुन्हे शाखेने अवघ्या 20 तासात उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,श्री.अमोल झेंडे, मा.सहायक पोलीस आयुक्त,श्री.नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,हेमंत पाटील, पोलीस उप-निरीक्षक,चैताली गपाट, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, दया शेगर व राजस शेख यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.