फुरसुंगी जवळ अटक करुन १७३ गुन्हे आणले उघडकीस : पुणे गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथकाने ११ दरोडेखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त

पुणे दिनांक २९ऑक्टोबर( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर व उपनगरात चोऱ्या आणी घरफोड्यांच्या व दरोडा गुन्हे यामध्ये अनेक गुन्हात वाढ झाली होती.याबाबत तपास करीत असताना पुणे गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथकांनी फुरसुंगी येथे कारवाई करुन दरोडेखोरांना अटक करुन एकूण १७३ गुन्हे उघडकीस आणले आहे.पोलिसांनी एकूण १कोटी २१ लाख २०० रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.
दरम्यान फुरसुंगी येथून अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराकडून पोलिसांनी पिस्तूल व अनेक धारदार शस्त्रे जप्त केले आहे.व सव्वा किलो सोन्याचे दागिने व एक किलो चांदी तीन पिस्तूल व एकूण १४ जिवंत काडतुसे जप्त केले आहे.तसेच यात एकूण चोरीची दहा वाहने जप्त करण्यात आली आहे.असा सर्व मिळून १ कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अन्य एका गुन्ह्यांचा तपास करत असतांना पोलिसांना गुप्त बातमी मिळाली व या आधारे पोलिसांनी फुरसुंगी येथे छापेमारी करून त्यांना अटक करण्यात आले आहे.यांनी ९ सप्टेंबर रोजी हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत देखील दरोडा टाकला होता.अशी माहिती पोलिस यांनी यावेळी दिली आहे.अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे अजयसिंग अर्जुनसिंग दुधाची ( वय २३ या.मांजरी पुणे) बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड ( वय २५ रा.वैदवाडी हडपसर पुणे) रामजितसिंग रणजितसिंग टाक.मनीष बाबुलाल कुशवाह. रामजितसिंग रणजितसिंग टाक.राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड. कणवरसिंग काळूसिंग टाक.लखनसिंग राजपूतसिंग दुधानी ( सर्व रा.रामटेकडी हडपसर पुणे) व रोहितसिंग सुरेंद्रसिंग जुनी ( रा. फुरसुंगी पुणे) अशी आहेत.पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे.पोलिस उपायुक्त अमोल झेंडे.व सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल तांबे उपस्थित होते.सदरची कारवाई गुन्हे शाखा युनूट तीन . युनूट दोन.खंडणीविरोधी पथक व दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.