Pune crime : आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या फरारी आरोपीस अटक

किरण भातलांवडे रा. मांजरी बुद्रुक पुणे यांने टाटा सुमो गाडीसाठी बँकेकडुन कर्ज घेवुन त्यास जामीनदार म्हणुन मित्र नामे राजेंद्र ऊर्फ राजु रामचंद्र राऊत रा. पुणे यांस घेतले होते. सदर बँकेचे हफते इसम नामे किरण भातलांवडे याने भरले नाही म्हणुन जामीनदार यास पैसे भरणेबाबत बँकेकडुन नोटीस देण्यात आली त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते.
त्यामुळे जामीनदार यांना बँकेत पैसे भरावे लागेल याचा मानसिक त्रास होवु लागला त्यावेळी बँकेने कर्जदार व जामीनदार यांचे विरुध्द मा.कोर्टात खटला दाखल केला त्याचा खटल्याची समन्स बजावणी समर्थ पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार करत होते. वारंवार कोर्टाचे समन्स घेवुन पोलीस अंमलदार येत असल्याने व कर्जदार मित्र बँकेत पैसे भरत नसल्याने जामीनदार यांना त्याचा मानसिक त्रास होवु लागला त्यांनी त्यांचा मानसिक त्रासाला कंटाळुन जामीनदार नामे राजेंद्र ऊर्फ राजु रामचंद्र राऊत रा. 309 घोरपडे पेठ पुणे याने राहते घरी आत्महत्या केली.
वडीलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेबाबत जामीनदार यांची मुलगी नामे वैष्णवी राऊत रा घोरपडे पेठ पुणे यांनी समर्थ पोलीस स्टेशन गुरनं 164/2022 भादंवि कलम 306 प्रमाणे इसम नामे किरण भातलांवडे रा. मांजरी बुद्रुक पुणे व समन्स बजावणी करणारे 2 पोलीस अंमलदार यांचेवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी नामे किरण भातलांवडे रा. मांजरी बुद्रुक पुणे हा फरार झाला होता.
युनिट-1 गुन्हे पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पाहिजे/फरारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, समर्थ गु र नं 164/2022 भादंवि कलम 306 मधील फरारी आरोपी नामे किरण भातलांवडे हा आपले अस्थित्व लपवुन राहत असुन तो एच.पी पेट्रोल पंप मांजरी बुद्रुक पुणे येथे मित्रास भेटण्यासाठी येणार आहे, अशी खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी त्याठिकाणी जावुन खात्री करुन आरोपी नामे किरण नवनाथ भातलांवडे वय 40 वर्ष रा. गवळी वस्ती, मांजरी बुद्रुक पुणे यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करता तो गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार असल्याचे कबुल केले आहे. त्यास पुढील कारवाई करीता समर्थ पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुकत पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे , मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे - 1, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट - 1 कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार निलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.