Pune crime : व्यापायास खंडणी मागुन लुटणाया टोळीस राजस्थान, सुजनगड येथुन अटक

२६ ऑक्टोबर २०२२ रोजी राजगड व्हिला कात्रज, पुणे येथे श्रवण, वय अंदाजे 28 वर्षे, नाव व पत्ता माहीती नाही व त्यांचे सोबतचे आणखीन दोन इसम, एक अनोळखी मुलगी यांनी आपआपासत संगनमत करुन फिर्यादी यास लुटण्याच्या उद्देशाने फिर्यादी व त्यांचे सोबत असलेल्या अनोळखी मुलीची छेड काढण्याचा आरोप टाकुन त्याबाबत पोलीसंात तक्रार देण्याची धमकी देवुन फिर्यादी यांचेकडुन 30 लाख रुपयांची खंडणी मागीतली.
फिर्यादीस घरात कोंडुन, त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन चाकु व पिस्टल सारखे दिसणारे हत्याराचा धाक दाखवुन फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, चांदीची एक अंगठी व रोख रक्कम काढुन घेवुन पळुन गेले आहेत म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 710/2022, भादंवि कलम 385,387,389,394,341,324,323,504,506(2), 34,120 (ब) अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी श्रवण व इतर अज्ञात आरोपीताचा शोध घेणे करता सदरचा गुन्हा हा आरोपी 1. श्रवण ऊर्फ मनिष सत्यनारायण मिश्रा, रा. टिळेकर नगर, कोंढवा, पुणे 2. सिंबुसिंह मंगुसिंह राठोड, रा. टिळेकरनगर, कोंढवा, पुणे 3. सिखा दास, रा. फलॅट 02, राजगड व्हीला, उत्कर्ष सोसायटी, कात्रज, पुणे यांनी केला असल्याचे व ते राजस्थान येथे पळुन गेल्याचे निष्पन्न झाल्याने मा.वरीष्ठांचे आदेशांन्वये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील, पोलीस अंमलदार सचिन गाडे, अशिष गायकवाड, सचिन पवार, सोनम गुरव यांनी राजस्थान येथे जावुन आरोपींना अटक केली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2,श्री.सागर पाटील मा.सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील, पोलीस अंमलदार सचिन पवार, सचिन गाडे, अशिष गायकवाड, अवधुत जमदाडे, मंगेश बोराडे, सोनम गुरव यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.