Pune crime : आरोपी सागर ऊर्फ मांडी येनपुरे व त्याचे इतर 04 साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर अंतर्गत कारवाई

कोथरुड पोलीस स्टेशनकडील रेकार्डवरील गुन्हेगार 1)सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे,वय-29, कोथरूड पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर सदस्य तथा कोथरुड पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार 2) साहिल विनायक जगताप,वय-25, कोथरूड,पुणे 3) साहिल रविंद्र कंधारे,वय-22, केळेवाडी,पुणे 4) वैभव ऊर्फ भो-या प्रदिप जगताप,वय-22, कोथरूड,पुणे 5)जितेश उर्फ पिल्या संतोष खेडेकर,वय-20, कोथरूड,पुणे यांचेवर कोथरुड पोलीस ठाणे येथे वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याची धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, लोकांची जीवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. शरीरा विरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
नमुद आरोपी नामे 1) सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे (टोळी प्रमुख) व त्यांचे साथीदारा विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.239/2022 भादंविक 307,141,142,144,148, 149,आर्म अॅक्ट 4,(25)महा.पो.अधि.क.37(1)135,आर्म अॅक्ट 4(25), क्रि.लॉ.क.3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील आरोपीतांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा ते जुमानत नसल्या मुळे तसेच त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं.239/2022 या गुन्ह्रात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(2),3(4) चा अंतर्भाव करणेसाठी सदर कायदयाचे कलम 23(1)(अ) अन्वये मंजुरी मिळणे करीता वरीष्ठ पोलीस निरीक्षक,महेंद्र जगताप,कोथरुड पोलीस ठाणे,पुणे शहर यांनी मा.पोलीस उप आयुक्त,परीमंडळ 03 पुणे शहर व श्रीमती. पौर्णिमा गायकवाड यांचे मार्फतीने मा.अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर श्री.राजेंद्र डहाळे यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन आरोपी नामे 1)सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे,वय-29,रा.आदर्श चौक,केळेवाडी,कोथरूड पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर सदस्य तथा कोथरुड पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार 2)साहिल विनायक जगताप,वय-25,रा.आदर्श चौक, केळेवाडी,कोथरूड,पुणे 3)साहिल रविंद्र कंधारे,वय-22,रा.लेन नं.3,हनुमाननगर,केळेवाडी,पुणे 4)वैभव ऊर्फ भो-या प्रदिप जगताप, वय-22,रा.राऊतवाडी,केळेवाडी,कोथरूड,पुणे 5)जितेश उर्फ पिल्या संतोष खेडेकर,वय-20,रा. केळेवाडी,कोथरूड,पुणे यांचेविरुध्द दाखल असलेल्या कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. 239/2022,भादंविक 307,141,142,144,148,149,आर्म अॅक्ट 4,(25)महा.पो.अधि.क. 37(1)135, आर्म अॅक्ट 4(25),क्रि.लॉ.क.3 व 7 प्रमाणे या गुन्ह्रात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(2),3(4) चा अंतर्भाव करणेची मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे यांनी मंजुरी दिलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.