Pune crime : अवैधरित्या पिस्तुल बाळगणाया रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधपणे पिस्तुल बाळगत असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलीसांना मिळाल्याने त्यास मार्केटयार्ड आंबेडकरनगर बैलबाजार येथे सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याचेकडे पिस्तुल व 1 जीवंत काडतुस मिळून आले असल्याने त्यास मार्केटयार्ड पोलीसांनी अटक केली आहे.
त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.11/11/2022 रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई 8235 गायकवाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत आंबेडकरनगर वसाहत बैलबाजार जवळील सार्वजनिक शौचालयामागे एक इसम उभा असुन त्याचे अंगावर निळया रंगाचा हाफ बाहयाचा टि-शर्ट,काळया रंगाची पॅन्ट असून तो अवैध्यरित्या पिस्टल बाळगत आहे. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस शिपाई 8235 गायकवाड यांनी सदरची बातमी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए.व्ही.देशपांडे व पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती सविता ढमढेरे यांना सांगितली असता, त्यांनी तपास पथकाचे अधिकारी व कर्मचायांना कारवाई बाबत सुचना देऊन सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेण्यास सांगितले.
वरीष्ठांकडून मिळालेल्या सुचनांप्रमाणे पोउपनि युवराज शिंदे यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस शिपाई 8235 गायकवाड,पो ना 626 धेंडे,,पोलीस हवा 3105 हिरवाळे, पोना 7554 जाधव, पोलीस शिपाई 2392 यादव, पोलीस शिपाई 8553सुर्यवंशी, यांचेसह मार्केटयार्ड आंबेडकरनगर बैलबाजार जवळ भागात सापळा रचून बातमीदाराकडून अधिक माहिती काढून सदर इसमास बैलबाजार समोरील सार्वजनिक शौचालयाचे मागे पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव- आतिश बाळकृष्ण खंडागळे वय 25 वर्ष धंदा मजुरी रा. सव्र्हे नं 580,आनंदनगर, बिबवेवाडी कोंढवा पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे डाव्या बाजुस कमरेला एक पिस्टल व कमरेला पुढील बाजुस लावलेली एक पिस्टल त्याचे अंगझडती मध्ये मिळून आले. त्यावेळी त्यास सदरचे पिस्टलचे परवाने आहेत का, याबाबत पोउपनि शिंदे यांनी त्यास पंचासमक्ष विचारता त्याने परवाना नसलेचे सांगीतले. तसेच त्यावेळी सदरचे पिस्टल कोणाचे आहे व कोठुन आणले याबाबत विचारले असता त्याने सदरचे पिस्टल माझेच आहे असे सांगुन कोठुन आणले याबाबत उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावेळी पोउपनि शिंदे यांनी सदरचे पिस्टल सुरक्षीत रित्या ताब्यात घेवून त्याचे मॅगझीन बाहेर काढुन चेक केले असता, त्यामध्ये प्रत्येकी एक जिवंत काडतुस असे मॅग्झीन मध्ये एक काडतुस मिळुन आले. त्याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करुन त्याचा पुढील तपास युवराज शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुर्व प्रादेशिक विभाग चे अपर पोलीस आयुक्त श्री. नामदेव चव्हाण, परिमंडळ 5 चे पोलीस उप-आयुक्त श्रीमती. नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सौ. तावरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही.देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोउपनि शिंदे,पोलीस अमंलदार गायकवाड,जाधव,धेंडे,हिरवाळे, यादव,सुर्यवंशी, यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.