Pune crime : लक्ष्मी पुजनाचे दिवशी रात्रीचे वेळी बुधवार पेठेत गाड्यांची तोडफोड करून,वाहनांचे नुकसान करून सामान्या नागरीकांना मारहाण करून,त्यांचेकडील मोबाईल जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद

३१ ऑक्टोबर २०२२ रोजी युनिट-1, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व अंमलदार असे त्यांचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “लक्ष्मी पुजनाच्या दिवशी रात्रीचे वेळी बुधवार पेठ परिसरात जबरी चोरी करून नेलेले मोबाईल चोरणारे आरोपी हे त्यांचेकडील चोरीचे मोबाईल विक्रीसाठी राष्ट्रभुषण चौकीत येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
त्याअनुशंगाने युनिट-1,गुन्हे शाखा,पुणे शहर पथकाकडील स्टाफसह एकुण चार आरोपीतांना ताब्यात घेवुन,त्यांचेकडे अधिक चौकशी करता,त्यांचेपैकी एक विधिसंर्षीत बालक यास ताब्यात घेवुन,इतर अटक केलेल्या आरोपींची नामे 1)अनुज जितेंद्र यादव,वय-19 वर्ष,रा.घरकुल सोसायटी,लेन नं.3,ओम गंगोत्री सोसायटी,वडगाव-शेरी,पुणे 2)दक्ष जुबेर गिलानी,वय 20 वर्ष,रा.गायत्री सदन,तिसरा मजला,वडगाव शेरी, पुणे 3)राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा,वय 23 वर्ष,रा.आनंदपार्क,वडगाव-शेरी,पुणे अशी असल्याचे सांगीतले.
सदर आरोपींकडे कसुन चौकशी करता, त्यांनी लक्ष्मीपुजनाचे रात्रीचे वेळी बुधवार पेठत गाड्यांची तोडफोड करून रोडवरती थांबलेल्या लोकांना मारहाण करून,त्यांचेकडील मोबाईल लुटल्याची कबुली दिली असून,त्यांचे कब्जातून 27,000/- रू किचे दोन ओपो कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट जप्त करून फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं.203/2022,भादवि कलम 392,427,504,506,34 हा गुन्हा उघडकीस आणला असून,त्यांचेकडून जप्त करण्यात आलेल्या दुस-या मोबाईल बाबत अधिक तपास चालु आहे. सदर आरोपी पैकी राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा याचे विरूध्द गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपीं यांना पुढील तपास व कार्यवाहीसाठी फरासखाना पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे-1,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-1,गुन्हे शाखा,पुणे शहरचे पेालीस निरीक्षक,संदीप भोसले, पोलीस उप-निरीक्षक,सुनिल कुलकर्णी, पोलीस उप-निरीक्षक,रमेश तापकीर पोलीस अंमलदार, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, विठ्ठल साळुंखे, अभिनव लडकत, तुषार माळवदकर, निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.