Pune crime : पुण्यात भर दिवसा युवकांच्या खूना प्रकरणी एक जण अटकेत

पुणे शहरात वडगाव बुद्रुक येथे मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलेल्या एका सतरा वर्षे अल्पवयीन तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली मारुन.व डोक्यात मातीची कुंडी घालून त्याचा खून केल्या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी एकास अटक केली आहे.
सदर खूना बाबत सिंहगड पोलीस स्टेशनच्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या स्वपनिल अंकुश उभे ( वय.२२. रा.माऊली अंगण अपार्टमेंट फ्लॅट नंबर १०३. सदाशिव दांगट नगर वडगाव बुद्रुक पुणे.) असे त्याचे नाव आहे.तर खून झालेल्यांचे नाव नागेश उर्फ सिल्व्हर सायबान्ना चिंचोळे ( वय.१७. रा.जाधव नगर.आर के.जिम शेजारी गल्ली नंबर.२. वडगाव बुद्रुक.पुणे.) असे आहे.
नागेश. हा युवक त्याची मैत्रीणी बाबत २५ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास सर्व्ह नंबर ५०/१२. घुले नगर दांगट यांच्या मोकळ्या गप्पा मारत असताना आरोपीने त्याच्या गळ्यावर काचेच्या बाटलीने मारहाण केली.व काचेची बाटली त्याच्या डोक्यात मारुन त्याचे डोके दगडांवर आटपून व त्यांच्या डोक्यात मातीची कुंडी घालून त्याचा खून केला आहे.सदर खूना बाबत नागेशचा भाऊ निलेश यांने सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये.रजिस्टर नंबर ४१८ / २०२२ कलम भा.दा.वी.३०२. नुसार गुन्हा दाखल केला आहे.व स्वप्निल याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सिंहगड पोलीस स्टेशनचे पुणे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.