Pune crime : सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी कट्टा व 02 जिवंत काडतुसे केले हस्तगत

०१ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंढवा पोलीस ठाणे,पुणे शहर तपास पथकास गोपनीय बातमी मिळाली की, मुंढवा चौक कडुन मगरपटटा जाणा-या मुख्य रस्त्याच्या ब्राीज खाली,मुंढवा,पुणे येथे अविनाश सुनिल जगताप हा स्वत: जवळ गावठी पिस्टल बाळगुन फिरत आहे. सदर बातमीची खातरजमा करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अजित लकडे यांनी तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक,संदीप जोरे, सहा.पोलीस निरीक्षक,प्रशांत माने यांना तपास पथकातील इतर अंमलदार यांचेसह रवाना केले होते. सहा.पोलीस निरीक्षक,संदीप जोरे यांनी त्यांचे कुशलतेने सदर ठिकाणी साध्या वेशात मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा लावुन,सहा.पोलीस निरीक्षक,संदीप जोरे व प्रशांत माने व तपास पथकातील अंमलदार यांनी सशईत इसमास पकडले.
सदर संशईत इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नांव अविनाश सुनिल जगताप वय-29 वर्षे,रा.चव्हाण चाळ,गोपी मेडीकल,226 मंगळवार पेठ,पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता,त्याचे पँन्टचे मागील बाजुस कंबरेस खोचलेले लोखंडाचे गावठी पिस्टल मॅगझीनसह त्यामध्ये 02 जिवंत काडतुसे किंमत रुपये 17,000/- किचे मिळुन आले. सदरचे पिस्टल व 02 जिवंत काडतुसे त्याने विनापरवाना जवळ बाळगलेबाबत मुंढवा पो स्टे येथे गुन्हा रजि.नंबर 288/2022,आर्म अॅक्ट कलम 3(25),महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन,सदर गुन्हया मध्ये आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपी अविनाश सुनिल जगताप याचेविरुद्ध फरासखाना पोलीस ठाणे,पुणे शहर येथे शरिरा विरुध्दचे दोन गुन्हे दाखल असुन तो पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे. वरील कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,पूर्व विभाग,श्री.नामदेव चव्हाण, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-5,श्रीमती.नम्रता पाटील मा.सहा.पोलीस आयुक्त,हडपसर विभाग,श्री.बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.अजित लकडे, पोलीस निरीक्षक,(गुन्हे), श्री.प्रदीप काकडे, सहा.पोलीस निरीक्षक,संदीप जोरे, सहा.पोलीस निरीक्षक,प्रशांत माने, पोलीस अंमलदार, दिनेश भांदुर्गे, वैभव मोरे, राजु कदम, महेश पाठक, राहुल मोरे, सचिन पाटील यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.