Pune crime : शिवतीर्थ कमानी जवळ एकाच्या डोक्यात कोयतेने वार

कोथरूड मधील शिवतीर्थ कमानी जवळ पौड फाटा कोथरूड रोडवर एकाने जुन्या भांडणाच्या रागातून एका युवकाच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून त्याला गंभीरित्या जखमी केल्याप्रकरणी हल्ले खोरा विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरच्या घटनेबाबत कोथरूड पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. २५ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास राज कुंडले. ( वय २२. रा.किष्किंदा नगर कोथरूड पुणे.) याला पौड रोडवर अज्ञात आरोपींनी राजू याचा मित्र मिहीर यादव यांच्याबरोबर जुना वाद होता त्याला तिथे फोन करून बोलवून घेतले "तू दुपारी मिरी यादव यांच्यासोबत यायला नव्हते पाहिजे तुझा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्यामुळे तू आता माझ्या डोक्यात बसला आहे. तुला माहित नाही का? मी कोण आहे. तुला लय मस्ती आली आहे काय " असे म्हणून राजूला शिवीगाळ करून "तुला आता खल्लास करतो" असे म्हणून शर्टच्या आत लपविलेला लोखंडी कोयता काढून त्याच्या डोक्यात वार केला.
त्याचा मित्र ओंकार यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हातात कोयता घेऊन सदर भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेबाबत राजू येणे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्या नंतर पोलिसांनी अज्ञात हलेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास. पोलीस उपनिरीक्षक माळी हे करत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.