Pune crime : रिक्षा चालक याचेकडुन व्याजाच्या पैशासाठी धमकवणाया सावकारास केले जेरबंद

खंडणी विरोधी पथक-1,गुन्हे शाखा,पुणे शहर येथे तक्रारदार यांना सावकार इसम बिलाल इसाक शेख रा.डॉल्फीन चौक,बिबवेवाडी,पुणे याने अवाजवी व्याजाच्या पैशाची मागणी करून अर्जदार यांचे घरी माणसे पाठवुन अर्जदार यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत असलेबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.
प्राप्त तक्रारी अर्जाची चौकशी करता अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी वेळोवेळी 29,500/- रूपये 15 व्याज दराने दिले होते. अर्जदारांनी त्याबदल्यात अर्जदार यांनी गैर अर्जदार यांना 53,990/- रूपये दिले असताना देखील गैरअर्जदार हे अर्जदारास दंड व व्याजापोटी आणखी 1 लाख 20 हजार रूपयांची मागणी करीत होता. व्याजाचे पैसे दिले नाही म्हणुन अर्जदार यांचे घरी माणसे पाठवुन अर्जदार यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणाया सावकाराविरुध्द खंडणी विरोधी पथकाने चौकशी करुन व्याज आकारणाया सावकार बिलाल इसाक शेख,रा.डॉल्फीन चौक,बिबवेवाडी,पुणे याचेविरुध्द चौकशी अंती दिनांक-03/11/2022 रोजी सहकारनगर पो स्टे गु.र.नं.229/2022, भा.दं.वि.कलम 384,385, 386,452,504,506,महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39,45 अन्वये खंडणी विरोधी पथक-1,गुन्हे शाखा पुणे शहर याचेकडुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता व मा.सह पोलीस आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे),श्री.रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त,(गुन्हे),श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहायक पोलीस आयुक्त-1,गुन्हे शाखा, श्री.गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक,अजय वाघमारेे, सपोनि.अभिजीत पाटील, पो.उप-निरी.विकास जाधव, पो.उप-निरी.यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार, प्रमोद सोनवणे, रविंद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, किरण ठवरे, अमर पवार व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.