Pune crime : खुनाचा प्रयत्न करून दहशत माजवीणारा आरोपी गजाआड

०१ नोव्हेंबर २०२२ रोजी युनिट-1 गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असताना,पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,बिबवेवाडी पो स्टे गुरनं. 162/2022,भादवि कलम 307,आर्म ऍक्ट 4(25), क्रिमीनल लॉ अमेटमेन्ट ऍक्ट 3 व 7,महा.पो.ऍक्ट 37(1)(3)सह 135 अन्वये दाखल गुन्ह्रातील आरोपी प्रशांत घाडगे हा गुन्हा घडल्यापासुन त्याची अटक चुकविण्यासाठी पुणे शहरातुन बाहेर गावी पळून जाणार असुन,त्याचेजवळ पैसे नसल्याने तो पैसे घेण्यासाठी,त्याचे मित्रास भेटण्यासाठी साहील हॉटेल मार्केटयार्ड,पुणे येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर बातमीचे अनुशंगाने युनिट-1 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक,संदीप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी साहील हॉटेल मार्केटयार्ड,पुणे येथे सापळा रचुन पाहीजे फरारी आरोपी नामे प्रशांत भाऊसाहेब घाडगे,वय-22 वर्ष,रा.गोरक्ष स्मृती बिल्डींग,गुजरवाडी रोड,कात्रज,खोपडेनगर,पुणे यास ताब्यात घेवून,त्याचेकडे अधिक कसुन चौकशी केली असता,त्याने त्याचे साथीदारांचे मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने,त्यास पुढील कार्यवाहीसाठी बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त,गुन्हे,श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे-1, श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-1,गुन्हे शाखा,पुणे शहरचे पोलीस निरीक्षक,संदीप भोसले,पोलीस उप-निरीक्षक,सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार, अजय थोरात, इंम्रान शेख, विठ्ठल साळुंखे व अय्याज दड्डीकर यांनी केली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.