Pune crime : खुनाच्या प्रयत्नातील दोन महीन्यांपासुन फरार असलेल्या आरोपींना खडक पोलीसांनी केले जेरबंद

यातील फिर्यादी हे दिनांक 10/09/2022 रोजी रात्री 02.30 वा दत्त मंदिराजवळ, काशीवाडी, भवानीपेठ, पुणे येथे गणेश विसर्जनाची मिरवणुक पाहुन घरी जात असतांना आरोपी सिध्दार्थ संजय कांबळे,अदनान मुश्ताक बागवान,नझीर सलीम शेख,आसिफ बाबुलाल शेख यांनी एकञ मिळुन जुन्या कारणाचे वादावरुन फिर्यादीस कु-हाडीने व लाथाबुक्कयांनी मारहाण केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि. क्र. 271/2022, भादवि कलम 307,323,506,34 भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25),महा. पो.कायदा कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
वरीलप्रमाणे दाखल गुन्हयातील दोन आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आले होते. यातील दोन आरोपी 1)सिध्दार्थ संजय कांबळे, वय 22 वर्ष, रा.महाराष्ट्र तरुण मिञ मंडळाजवळ 611, कासेवाडी भवानी पेठ, पुणे 2)अदनान मुश्ताक बागवान वय 21 वर्ष रा.दिपज्योत तरुण मंडळ, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे हे गुन्हा दाखल झाल्या दिनांका पासुन अटक चुकविण्यासाठी फरार होते.नमुद पाहीजे आरोपीबाबत शोध व तपास चालु असताना आरोपी सिध्दार्थ संजय कांबळे हा गगणदिप अपार्टमेंट आंबेगाव बुद्रुक धनकवडी पुणे येथे आला असल्याबाबत पोलीस अंमलदार संदिप तळेकर व सागर घाडगे यांना बातमीदारा मार्फत खात्रिशीर माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने श्रीमती संगीता यादव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे व श्री.राजेश तटकरे,पोलीस निरीक्षक (गुन्हे),खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आली. आरोपी सिध्दार्थ कांबळे यास आंबेगाव बुद्रुक धनकवडी पुणे येथुन सापळा रचुन शिताफिने पकडण्यात आले आहे. तसेच आरोपी अदनान मुश्ताक बागवान हा न्यु ग्रेस इंग्लिश स्कुलजवळ कोंढवा पुणे येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यास सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे. अशा प्रकारे दोन महीन्यांपासुन पोलीसांची अटक चुकविणाया दोन्ही आरोपींना सदर गुन्हयामध्ये दिनांक 11/11/2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
नमुद कारवाई मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता,मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे,श्री.राजेंद्र डहाळे मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1,पुणे (अतिरिक्त पदभार) श्री. आर.राजा, व मा.सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्री.सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन श्रीमती संगीता यादव, पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्री.राजेश तटकरे, सहा.पोलीस निरीक्षक, राकेश जाधव सहा.पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप निरीक्षक अतुल बनकर, व पोलीस अंमलदार अजीज बेग,संदीप तळेकर,सागर घाडगे,विशाल जाधव,नितीन जाधव,लखन ढावरे,रफिक नदाफ,अक्षयकुमार वाबळे, महेश पवार,महेश जाधव,तेजस पांडे यांचे पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.