Pune crime : मालकाच्या घरी चोरी करणाया नोकरास व त्याच्या साथीदारांना केले जेरबंद

२९ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशन,गु.र.नं.237/2022 भादवि कलम 380,381,411,34 अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्राचा तपास करत असताना फिर्यादी यांच्या घरातील नोकर नामे चंदू बालाजी मेडंेवाढ याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने सदर गुन्ह्राची कबुली दिली व त्याने चोरलेले सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम ही त्याचे इतर साथीदार यांना दिले आहे असे सांगितले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे साथीदार 1)सारिका आप्पासाहेब सावंत, रा.सध्या काळेपडळ, इंद्रायणी कार्यालया शेजारी, हडपसर, पुणे मुळ रा.मु.पो. शेगाव ता. जत जि. सांगली 2) भावना रविंद्र कोद्रे,रा.काळेपडळ,इंद्रायणी कार्यालया शेजारी,हडपसर, पुणे मुळ रा.गांधी चौक,सीएनजी पंपासमोर,मुंढवा, पुणे (3)जनार्दन नारायण कांबळे, रा.शाहूनगर, कुपवाड रोड,सांगली मुळ रा.मु.पो.कोसारी, ता.जत,जि. सांगली, 4) ॠ षिकेश राजाराम तोरवे, रा.मु.पो.कोसारी,दुर्गा माता मंदिराच्या समोर,ता.जत जि.सांगली. 5) दुर्गाचरण रविंद्र कोद्रे, रा.काळेपडळ, इंद्रायणी कार्यालया शेजारी, हडपसर, पुणे मुळ रा.गांधी चौक, सीएनजी पंपासमोर,मुंढवा,पुणे यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्ह्रातील सोने हे सोनार नामे प्रविण पोपट दबडे, प्रितम पोपट दबडे व त्याच्या साथीदार महेश महादेव भोसले सर्व राहणार ढालगाव, ता.कवठे महांकाळ,जि.सांगली यांना विकले असल्याचे सांगितले.सदर सोनारांना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयामध्ये एकूण 22,80,000/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. 237/2022 भादवि कलम 380,381,411,34 गुन्हा उघडकीस आणून उत्तम कामगिरी केली आहे. पुढील तपास सपोनि अभिजीत पाटील, खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता,मा.पोलीस सह-आयुक्त, श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे,गुन्हे शाखा,पुणे, मा.पोलीस उप-आयुक्त, श्री.श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा पुणे शहर, मा.सहायक पोलीस आयुक्त-1, गुन्हे शाखा, श्री.गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक श्री.अजय वाघमारेे, सपोनि अभिजीत पाटील, पोउनि विकास जाधव, श्रेपोउनि यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार प्रविण ढमाळ, मधूकर तुपसौंदर, प्रमोद सोनवणे, रविंद्र फुलपगारे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्योधन गुरव,अमोल आवाड,राजेंद्र लांडगे,विजय कांबळे,प्रफुल्ल चव्हाण,अमर पवार,संभाजी गंगावणे यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.