Pune crime : येरवड्यात घरफोडी करून पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरी

येरवड्यातील आगाखान पॅलेस समोरील डँकर्स लाईन समोरील कॉटर्समध्ये प्रवेश करून आणण्यात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून. घरातील बेडरूम मधील कपाटाचे लाॅकर तोडून.२ लाख ८५ हजार ५९४. रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
सदर घटनेबाबत येरवडा पोलीस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.
हेमंतकुमार बंगवाल ( वय.४७. रा.१३. ई डब्लु बटालियन घोरपडी पुणे) हे येथे सुभेदार पदावर काम करतात. त्यांचे सहकारी नायक सुभेदार हे गोवा येथे ट्रेनिंग साठी गेले असून त्यांची पत्नी देखील घराला कुलूप लावून कोलकत्ता येथे गेले आहेत. घर बंद असताना आणण्यात चोरट्याने फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून. त्यांच्या बेडरूम मध्ये प्रवेश करून. बेडरूम मधील कपाटाचे लाॅकर तोडून एकूण . २ लाख ८५ हजार ५९४. रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. या चोरी प्रकरणी बंगवाल यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.