ड्रेसवर असतांनाच माध्यमांना दिली होती मुलाखत पिंपरी चिंचवड येथे होते कार्यरत : ड्रीम ११च्या माध्यमातून तब्बल दीड कोटी रुपये जिंकलेले पुणे जिल्ह्यातील पीएसआय सोमनाथ झेंडेना पोलिस आयुक्तांनी केले निलंबित

पिंपरी -चिंचवड १८ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील सासवड भागातील झेंडे वाडीतील व पिंपरी -चिंचवड येथे कार्यरत असलेले करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन झाले असून.वर्दीच्या वर्तवणुकिला बाधा निर्माण केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.पण विभागीय चौकशी मध्ये त्यांना आपली बाजू मांडता येणार आहे. क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याच्या वेळी झेंडेनी ड्रीम ११ ऑनलाइन गेम मध्ये स्वताःची टीम लावली आणी या टीमने आठ दिवसांत तब्बल दीड कोटी रुपये जिंकून करोडपती झाले होते.
दरम्यान झेंडे यांना क्रिकेट 🏏 चे वेड होते या वेडातून त्यांनी वर्ल्ड कप सामन्याच्या दरम्यान ड्रीम ११ टीम केली होती.या टीमने आठ तासात दीड कोटी रुपये जिंकले होते.व त्यांनी ड्रेसवर असतांनाच माध्यमांना मुलाखत दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.याबाबत पिंपरी चिंचवड येथील भाजप पक्षाचे कार्यकर्ते यांनी गुहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे तक्रार केली होती.व पुढे खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान दीड कोटी रुपयांची रक्कम आता त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.तरुण पिढी अशा ऑनलाइन गेम्सच्या आहारी जाऊ नये व यात कुणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून जनजागृती करणं गरजेचं आहे.पण यात स्वतः पोलिस अधिकारी हे मध्यातून तरुणांन समोर व समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं अनेकांन कडून बोललं जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर झेंडे यांना दोषी ठरवले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.