Crime : पुणे म.न.पा. अंतर्गत असणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांना१६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

पुणे दिनांक ८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे महापालिक वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या माध्यमातून चालू असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय काॅलेज महाविद्यालयातील वैद्यकीय अधिष्ठाता आशिष श्रीनाथ बनगिनवार ( वय ५४.) यांना १६ लाख रुपयांची लाच मधील पहिला हप्ता मधील १० लाख रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.व आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली आहे.त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार.तक्रदार यांचा मुलाला एन ई ई टी परिक्षा २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता.त्यांची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या कॅप राउंडमध्ये पुणे महानगर पालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय मेडिकल कॉलेज पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटा मधून निवड झाली होती.निवड यादीच्या आधारे तक्रारदार हे वैद्यकीय अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना प्रवेश प्रक्रिया संदर्भात भेटण्यासाठी गेले असता दरवर्षी शासकीय विहीत फी २२ लाख ५० हजार रुपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
दरम्यान तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नव्हती व त्यांनी या बाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.या तक्रारी नंतर या बाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने पडताळणी करण्यात आली.या मध्ये वैद्यकीय अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.यामधील पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपये बनगिनवार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.नंतर या प्रकरणी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर बनगिनवार यांना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.