Pune Police Commissioner : माथाडी संघटनेकडून होणा-या त्रासापासून व्यापाऱ्यांची सुटका करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची पावले

दिनांक 24/01/2023 रोजी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.रितेश कुमार यांचे अध्यक्षेतेखाली पुणे आयुक्तालय हददीतील औद्योगीक कंपन्या,आयटी कंपन्या,व्यावसायीक व्यापारी संघटना,चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर, यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकिचा उद्देश हा पोलीस आयुक्तालय हददीतील वरील प्रकारच्या कंपन्या व व्यापारी यांना काही माथाडी संघटना व तसेच माथाडीचे नावाखाली होणा-या त्रासापासून त्यांची सुटका व्हावी व भयमुक्त वातावारणात त्यांनी आपले कामकाज करावे असा आहे.
गुन्हेगारी टोळयांमार्फत व्यापारी उदयोजक यांच्याकडुन होणारी खंडणी वसुली,माथाडी कामगार म्हणुन गुंडगीरी करणारे खंडणी खोरांचा ञास,नोकरदार महिलांचे सुरक्षेबाबत विशाखा कमीटी,वाहतुक समस्या व इतर शासकीय खात्यांबाबत तक्रारी या विषयावर बैठक झाली.
सदर बैठकीस औद्योगीक कंपन्या,आयटी कंपन्या,व्यावसायीक व्यापारी संघटना,चेंबर
ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर,यांचे सुमारे 100 ते 120 प्रतीनिधी उपस्थित होते.त्यांनी बैठकी दरम्यान
शहरात गुन्हेगारी टोळयामार्फत खंडणी वसुली,माथाडी कामगारांकडुन अवास्तव पैशाची मागणी,दादागिरी
केली जाते.वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते यावर आळा घालावा.माथाडी कामगारांचे मजुरी दर
ठरवुन ते प्रदर्शित करावे.वाहतुक समस्येबाबत योग्य त्या उपाय योजना कराव्यात याबाबत मागणी केली.
मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी याबाबत सर्वांनी केलेल्या सुचना लक्षात घेवून
संबंधीत पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पोलीस स्टेशनला कळवुन उचीत कारवाई करण्यात येईल असे
सांगीतले. तसेच तक्रारदारांनी न घाबरता आपल्या तक्रारी दयाव्यात,वाहतुक समस्यांबाबत कंपन्यांशी संपर्क
साधुन ट्राफिक वार्डनची संख्या वाढविणेबाबत पोलीस उप आयुक्त वाहतुक यांना निर्देश दिले.तसेच
औदयोगीक कंपन्या, आयटी कंपन्या वगैरे कंपन्या तसेच व्यापारी यांना माथाडी किंवा माथाडीचे नावाखाली
कोणी त्रास देवून खंडणी मागत असेल तर अशा गुन्हयातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असे
सांगितले.
तसेच सदर बैठक ही पुणे शहर पोलीसांनी पुढे येवून स्वत: घेतलेली आहे ती सर्व औदयागिक
,आयटी वगैरे कंपन्या तसेच व्यापारी यांच्या पोलीस विभागाशी निगडीत समस्या लक्षात घेवून त्याच्या समस्या
सोडवून भयमुक्त वातावरण तयार करणे हा असल्याचे सांगीतले. तसेच उपस्थित सर्व लोकंाना त्यांनी पुणे
शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणारे सर्व पोलीस उप-आयुक्त वगैरे वरिष्ठ अधिकारी यांचे मोबाईल
नंबर शेअर केलेले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.