आक्रमक झालेल्या पुणे पोलिसांची तशी चाचपणी सुरु, : ड्रग्स माफिया ललित पाटीलला मकोका लावण्याची पुणे पोलिसांची शक्यता; पोलिसांकडून चाचपणी सुरु

पुणे दिनांक १९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील ससून रुग्णांलयातून पळून गेलेल्या ड्रग्स माफिया बाबत पुणे पोलिस चांगलेच आक्रमक झाले असून ललित पाटील याला आता मकोका लावण्याची शक्यता आहे.त्याच्या या ड्रग्स धंद्यात त्याला मदत करणाऱ्या साथीदारांवर देखील मकोका तरतुदी लागू करण्याची पुणे पोलिसांची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.आता प्रर्यत पोलिसांनी या ड्रग्स प्ररकाणात एकूण १५ आरोपी यांना अटक करण्यात आले आहे.
दरम्यान ललित पाटील हा मुंबई मधील साकीनाका पोलिस कस्टडी मध्ये आहे.त्याच्या कस्टडी साठी आता पुणे पोलिस प्रर्यत्नशिल आहे.दरम्यान ललित पाटील यांच्यावर पुणे, पिंपरी चिंचवड व नाशिक, आणि मुंबई पोलीस स्टेशन येथे अंमली पदार्थ बाबत गुन्हे दाखल एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान मकोका अंतर्गत तरतुदीनुसार त्याच्या अटकेसाठी आधार ठरू शकतो.तपासात ड्रग्स माफिया ललित पाटील हा गुन्हेगारी सिंडिकेट सदस्य असलेचे सिध्द झाले आहे.दरम्यान २ ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णांलयातून पोलिसांच्या सहकार्याने व रुग्णालयांतील कर्मचारी यांच्या संगनमताने ललित पाटील हा पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांची प्रतिमा कलंकित झालेली आहे.तसेच नाशिक येथे गेलेल्या पोलिसांच्या १० टीमला देखील मोठ्या प्रमाणावर अपयश आल्या बाबत देखील पुणे पोलिसांच्या पदरी निराशाच आली आहे.त्यानंतर समाजमाध्यमातून व मिडीया माध्यमातून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राजकिय नेत्यांनी देखील या बाबत आरोप केले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिस चांगलेच आक्रमक झाले असून.त्या दुष्टीने आता ड्रग्स माफिया ललित पाटील व त्याला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी मकोका अंतर्गत तरतुदीनुसार कारवाई सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.