ड्रग्स माफिया पाटील बंधूंनी नाशिक मध्ये केली जमीनीत गुंतवणूक पोलिसांचे सह्हायक निबंधकांना दिले पत्र : पुणे पोलिसांनी ललित पाटील यांने ८ किलो सोने घेणाऱ्या सराफांच्या नाशिक येथून आवळल्या मुसक्या.नाशिक मधील अन्य सराफ पोलिसांच्या रडारवर

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील ससून रुग्णांलयातून रुग्णालयांचे कर्मचारी व पोलिसांना पैसे देऊन त्यांच्या सह्हयाने पळून गेलेल्या ड्रग्स माफिया ललित पाटील व त्यांचा भाऊ भूषण पाटील यांनी ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांतून नाशिक येथील एका सराफांच्या माध्यमातून तब्बल आठ किलो सोने घेतले होते.पुणे पोलिसांनी याप्रकरणी तपास करीत नाशिक येथील सराफांच्या मुसक्या आवळल्या असून त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.नाशिक मधील अन्य एक सराफ फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.तर नाशिक येथील अन्य सराफ है पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत.
दरम्यान ड्रग्स माफिया पाटील बंधूंनी ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या बक्कळ पैसातून सोनं व चांदी मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती.याच पैशांतून त्यांनी नाशिक येथील एका सराफांच्या माध्यमातून एकूण आठ किलो सोने खरेदी केले होते.याबाबत पुणे पोलिसांचा तपास सुरू होता.याच तपासात पुणे पोलिसांनी एका सराफाला अटक केली आहे.यातील एक सराफ फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नाशिक मधील अन्य सराफ देखील पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत.तसेच पाटील बंधूंनी मागील दहा वर्षांच्या कालावधीत अनेक जमीनींचे व्यवहार केले आहेत.याबाबत पुणे पोलिसांनी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाला तसे पत्र दिले असून ललित पाटील व भूषण पाटील यांनी खरेदी केलेल्या जमीन खरेदीचा तपशील मागितले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.