Pune police nabbed the main accused in the koyta gang : पुणे पोलिसांनी कोयता गॅंग मधील प्रमुख आरोपीला केले गजाआड.

मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत दिवसें-दिवस वाढत चाललीये.
वाढत्या दहशतीनंतर पुणे पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून कोयता गँगवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गँगच्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तसेच पोलिसांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ४० हून अधिक कोयते जप्त केले आहेत, अशी माहिती पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरक्षः दहशत माजवली होती. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले होते..
कोयता गँगची दहशत नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करत कोबिंग ऑपरेशन सुरू केले होते. त्यादरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुधवारी विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.
त्यात विविध भागातून ४० हून अधिक कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.