Crimes : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनांची व मुक्कामाची व्यवस्थे साठी पुणे पोलीस यंत्रणा सज्ज.

पुणे दिनांक ११ ,जून ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)पुणे शहरात संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे अगमण दिनांक १२जून पुणे शहरात होणार असून दोन्ही पालख्यांचा दोन दिवास मुक्काम असणार आहे.दिनांक १५.जून रोजी पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या पाश्वभूमीवर पुणे शहर पोलीसांकडून बंदोबस्ताची संपूर्ण तयारी पुर्ण झाली आहे.अशी माहीती पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी.दिली आहे.
सदर पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. तसेच इतर राज्यांतून देखील वारकरी सहभागी होतात. याच पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.या करीता पुणे पोलीसांकडून विषेश खबरदारी घेण्यात आली आहे.संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे शहर आयुक्तालयातील बोपखेल या ठिकाणी अगमण होईल व नंतर फुले नगर येथे दुपारचे जेवण होऊन विसावा होईल. नंतर संगमवाडी येथे विसावा होईल. नंतर पालखी भवानीपेठेतील विठोबा मंदिर या ठिकाणीच मुक्कामी राहील. तसेच जगदगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरातील हॅरिस ब्रिज खडकी या ठिकाणी आगमन होईल. व नंतर तुकाराम पादूका चौकात विसावा होऊन पालखी नाना पेठेतील निवडुंगया विठोबा मंदिर या ठिकाणी मुक्कामी राहील दोन्ही पालख्यांचा मुक्काम सोमवार व मंगळवार पुण्यात राहणार आहे.दिनांक १४जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्काम ठिकाणाहून निघून हडपसर गाडीतळ येथे विसावा घेऊन दिवेघाट मार्गे सासवड वरून पुढे प्रस्थान करेन.
तर संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतून निघून कुंजीर वाडी व पुढे ऊरूळी कांचन वरून पुढे मार्गस्थ होईल. या पालखी सोहळ्यात बंदोबस्तात पुणे शहर पोलीसांकडून २ अप्पर पोलीस आयुक्त १०पोलीस उपायुक्त २०सहाययक पोलीस आयुक्त ११६पोलीस निरीक्षक ४४३ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक ५६९३ पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात असून पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस. बॉम्ब शोधक पथक. तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडून एक. एस आर पी एफ कंपनी. व ५००.होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.