Crime : पुणे दहशतवादी तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे

पुणे दिनांक ८ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात यापूर्वी दोन दहशतवादी यांना अटक करण्यात आली होती.या दहशतवाद्यांनी पुण्यात घातपात करण्याची योजना आखली होती ती तपासा दरम्यान आता उघड झाली आहे.आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे देण्यात आला आहे.व त्याबाबत आता प्रक्रिया चालू झाली आहे.
पुणे पोलिसांनी १८ जुलैला दोन दहशतवादी यांना अटक करण्यात आली होती.मोटरसायकल चोरी प्रकरणी त्यांना अटक केली होती.हे दहशतवादी राष्ट्रीय तपास संस्थेच्या मोस्ट वाॅन्टेड दहशतवादी प्रकाराणातील आरोपी निघाले .यांची नावे इम्रान खान व मोहम्मद युनूस साकी अशी आहेत.यातील गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास एटीएसकडे यापूर्वी देण्यात आला होता.दरम्यान या दोघांना मदत करणारा अब्दुल कादर दस्तगीर पठाण व साहिब नसरुद्दीन काझी यांना देखील एटीएसने अटक करण्यात आली आहे.तसेच याप्रकरणी मुंबई मधील कारागृहात असलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
आता पुणे दहशतवादी तपास एटीएसकडून काढून ए.एन.आय.ए.कडे देण्यात आला आहे.यातील सर्व दहशतवाद्यांचे इसीस व अल-सुफा या संघटनेशी आहेत.या संबंधा मुळे आता हा तपास नव्याने एन.आय ए.कडे देण्यात आला आहे.तशी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे.या दहशतवाद्यांना पैसे डॉ अदनान पुरविण्यात आल्याचं या पूर्वीच तपासात उघड झाले आहे.बडोदा वाला यांनी देखील पैसा या दहशतवादी यांना पुरवलं आहे.हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे.बडोदावाला या पूर्वीच इसीसशी संबंध असल्याचा कारणांमुळे अटक केली असून सध्या तो मुंबई मधील आर्थर रोड जेलमध्ये आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.