बांधकाम व्यावसायिक डि.एस कुलकर्णी यांना जामीन : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डि.एस . कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर

पुणे दिनांक २२ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस . कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे.तब्बल पाच वर्षांनंतर कुलकर्णी हे तुरुंगातून बाहेर आलेले आहेत, सर्व सामान्य गुंतवणूकदारांना जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांनी हजारो गुंतवणूकदारांना एकूण ८०० कोटींना फसवल्याचा त्याच्यावर आरोप होता.त्यांना २०१८मध्ये डी.एस.कुलकर्णी व त्यांची पत्नी व मुलगा, मेव्हणे व जावाई .व कंपनी मधील काही लोकांना अटक करण्यात आली होती.ज्या कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्या कायद्यान्वये किती काळ तुरुंगात ठेवता येते, हे न्यायालयाने पाहिलं.व पाच वर्षे तुरुंगात राहिल्या नंतर त्यांना जामीन मिळाला आहे.
दरम्यान डी.एस.कुलकर्णी वेगवेगळ्या बॅकाकडून एकूण १ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.याच कर्ज प्रकरणांत राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती.या प्रकरणी सरकारने यामध्ये लक्ष घालून गुंतवणूक दादांचे गुंतलेले पैसे परत द्यावे अशी देखील मागणी गुंतवणूक दरांची होती.आता डी.एस.कुलकर्णी बाहेर आल्यावर गुंतवणूक दारांचे पैसे मिळणार का.? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनींने दिले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.