खासगी फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी : मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार.गावदेवी पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १६ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत एका महिलेला खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ३८ वर्षीय आरोपींने डाॅक्टरवर वारंवार बलात्कार केला.व ब्लॅकमेल करून महिलेकडून लाखो रुपये घेतले.सदरची घटना ही गावदेवी भागात घडली आहे.याबाबत सदर डॉक्टर महिलेने गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. पीडित डॉक्टर महिलेची ओळख एक क्लबमध्ये बॅंटमइंटन खेळताना झाली होती.त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. दरम्यान काही दिवसांने पीडित महिलेचे तिच्या पती सोबत वाद होऊ लागले.तुमच्या नवरा बायको मधील वाद मिटवून देतो असे सांगून आरोपींने पीडित डॉक्टर महिलेचा विश्र्वासात घेतलं.व क्लब मध्ये बोलावून जबरदस्तीने दारु पाजली.व पीडित महिलेला स्वताच्या कार मधून घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला.व त्याचवेळी पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढून घेतले.व वारंवार बलात्कार करून धमकी देऊन लाखो रुपये घेतले दरम्यान आरोपींचे कृत्य मध्ये वाढ झाल्याने संबंधित महिला डॉक्टरने गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना त्याला अटक केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.