मराठा आंदोलंकावर लाठीचार्ज प्रकरणी : थोडी लाज असेल तर राजीनामा द्या , आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या वर हल्ला

पुणे दिनांक ४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालन्यातील अंबड अंतरवाली सराटी गावातील आंदोलंकावर अमानूष पणे लाठीचार्ज करणारे सरकार जनरल डायरचे आहे.असा हल्लाबोल केला शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला आहे.मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांच्या आदेशाशिवाय पोलिस एवढा अमानूष लाठीचार्ज करणे अशक्य आहे.थोडी लाज असेल तर आता खोके सरकारने त्वरित राजीनामा द्यावा.अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे हे बीडीडी चाळी मधील मान्सून महोत्सवात आले होते.यावेळी ते माध्यमाशी बोलताना सांगितले.की एखाद्या शत्रूवर हल्ला करावा असा लाठीचार्ज सरकारने मराठा आंदोलंकावर करायाला लावला.असे ते म्हणाले.एवढा अमानूष पणे लाठीचार्ज करण्याची गरज होती का.असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.एवढा संवेदनशील आंदोलन होत असताना.मुख्यमंत्री यांना न कळविता पोलिस लाठीचार्ज करणे अशक्य आहे.मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना त्याची शंभर टक्के कल्पना असणार.सरकारच्या आदेशावरून हा लाठीचार्ज झाला आहे.असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.