अग्निशमन यंत्रणा नाही व इमारतीच्या गच्चीवर चालवले जात होते हाॅटेल्स : पुण्यातील रुफटाॅप हाॅटेल्स पुण्यातील मोठी डोकेदुखी ठरत आहे ९ हाॅटेल्सवर महानगरपालिकेची कारवाई

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरात आलिशान हॉटेल्स रुफटाॅप दिवसांन दिवस पुणेकर नागरिकांची मोठी डोकेदुखी बनले आहे.या हाॅटेल्स संदर्भात अनेक पुणेकर नागरिकांनी हाॅटेल्सच्या आवाजाने त्रास होत असल्या बदल महानगरपालिकाकडे तक्रारी केल्या होत्या.आता महानगरपालिके च्या वतीने हाॅटेलवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे.मागील चार दिवसांत कारवाई करायला सुरुवात केली आहे.पुण्यातील ९ रुफटाॅप हाॅटेल्सवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे.
दरम्यान एका वर्षात एकूण २९ रुफटाॅप हाॅटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहर पोलिस व पुणेमहानगरपालीकाच्या अधिकाऱ्यांनी देखील पुण्यातील रुफटाॅप हाॅटेल्स विरोधात कठोर कारवाई करण्यांचा निर्णय घेतला आहे.दरम्यान पुणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांत कारवाई देखील मोठ्या प्रमाणावर केली होती.पुणे महानगरपालिकेच्या वतीने रुफटाॅप बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महंमद वाडी.कल्याणीनगर. येरवडा कोरेगाव पार्क.बाणेर.पाषाण.कोथरुड.खराडी व शहरातील इतर भागात असलेल्या प्रसिद्ध रुफटाॅप पब व बारला यापूर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.व त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती.पुण्यातील शहरातील अनेक मध्यवर्ती भागात हे बार रात्री पसून पहाटे प्रर्यत मोठ्या आवाजात सुरू असताना दिसतात या पब मधील आवाज हा रोडवरील वाहन चालक व रहिवासी यांना येतो.मोठ मोठ्यांने आवाज या पब मधील डिझेल वाढवितात तसेच नावाने चिंग झालेली तरुणाई यांचा रोडवरील ढिंगाना हा वेगळाच असतो.याबाबत रोडवरून जाणारे नागरिकांना व स्थानिक रहिवासी यांना याचा प्रचंड त्रास होतो. नागरिकांनी अनेकदा या पब बाबत पोलिसांनकडे व पुणेमहानगरपालीकाकडे केल्या आहेत.पण कारवाई सुरू झाली की राजकीय पक्षांच्या पुढारी हे दबावातंत्र वापरतात.अशा राजकीय पुढारी यांच्यावरच प्रथम कारवाई करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.सध्या रुफटाॅप हा पब पुणे महापालिकेच्या रडारवर आहे.यात कारवाई झाल्यानंतर हेच पब चालक पुन्हा तिथे पब पुन्हा सुरू करतात तर काही पब हे राजकीय नेतेमंडळी यांचेच आहेत.पण हे पुणे सारख्या शिक्षाणांच्या माहेर घरात अशी पब संस्कृती ठिक नाही.तसेच यापूर्वी लुल्ला नगर भागात मोठ्या प्रमाणावर आग लागली होती.अशा बेकायदेशीर हाॅटेल व पबवर कारवाई होणे गरजेचे आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.