Crime : पुण्यात विश्रामबाग व फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीट मार्शल व दामिनी पथकाचा रूट मार्च

पुणे दिनांक २.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)पुणे शहरात कोयता गॅगचा धुमाकूळ सोसायटी मध्ये पार्क केलेल्या गाड्याची तोडफोड.भर दिवसा पत्रकारवर पिस्तूल मधून गोळीबार. भर दिवसा युवतीवर कोयत्याने हल्ला अशा असंख्य गुन्ह्यात वाढ झालेल्याच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलीस अॅकशन मोडवर आली असून आता बीट मार्शल व दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असून. पुणे शहरातून विश्रामबाग व फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला आहे.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्या साठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार हे चांगलेच अॅकशन मोडवर आले असून. प्रतिबंधक कारवाई बरोबरच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात दामिनी पथक. अॅक्टिव्ह करण्यात आले असून त्याच बरोबर शस्त्रधारी बीट मार्शल यांची नेमणूक केली आहे.त्याच पाश्र्वभूमीवर शहरातून विश्रामबाग व फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीट मार्शल व दामिनी पथकाचा रूट मार्च काढण्यात आला आहे. या पथकात अजून मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान गुन्हेगारांवर या पथकाचा २४.घंटे वाॅच आसणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहणार आहे.
ही दोन्ही पथके शाळा. महाविद्यालय. वसतिगृह. क्लासेस. या भागात दामिनी पथके तैनात आसणार आहे. तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी रात्री व दिवसा नाकेबंदी करण्यात येणार आहे. ओला.ऊबेर. रिक्षा. यांची तपासणी करण्यात येणार आहे. शहरात प्रतेक गुन्हेगारांवर पोलीसांची करडी नजर आसणार आहे. अल्पवयीन मुलांवर नजर ठेवण्या साठी. ठिक ठिकाणी सी. सी.टिव्ही बसविण्यास सुरूवात झाली आहे. दामिनी पथक व बीट मार्शल हे शाळा. काॅलेज. माॅल्स. महिला वसतिगृह. याठिकाणी नियमीत पणे गस्त घालण्यासाठी साठी त्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी शहरातील गुंड तसेच गॅगस्टार यांच्या निवास स्थाना च्या भागात कोम्बिंग. ऑपरेशन राबविण्यात येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.